पावसाळ्यात वेगाने वाढत आहे कोरोनाचा धोका; इन्फेक्शन रोखण्यासाठी वापरा 'हा' रामबाण उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 09:30 AM2020-06-04T09:30:02+5:302020-06-04T09:37:32+5:30
जीवघेण्या विषाणूंपासून स्वतःचा बचाव कशाप्रकारे करता येईल याबाबत सांगणार आहोत.
कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता आहे. कारण पावसाळ्यात विषाणूंची वाढ होऊ शकते. त्यामुळे इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. जगभरातील अनेक शास्त्रज्ञ कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज आम्ही तुम्हाला जीवघेण्या विषाणूंपासून स्वतःचा बचाव कशाप्रकारे करता येईल याबाबत सांगणार आहोत.
आरोग्यतंज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रोज काही प्रमाणात घश्यात कोरोना व्हायरस प्रवेश करत आहे. त्यासाठी आपल्याला कोरोना व्हायरसची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ द्यायचे नाही. जेणेकरून व्हायरस कमकुवत होईल. आयुर्वेदात उल्लेख असलेल्या काही घरगुती उपायांबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आहारात काही पदार्थांचे सेवन करायला हवं.
अशा तयार करा काढा
रोज दिवसातून एकदातरी काढा करून प्या. लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही काढा पीत असाल तेव्हा गरम असायला हवा. चहाप्रमाणे थोडा थोडा तुम्हाला हा काढा प्यायचा आहे. हळद आणि काळं मीठ एकत्र करून गरम पाणी तयार करा. आणि त्या पाण्याच्या गुळण्या करा. हळदीचे पाणी प्यायल्याने शरीरातील व्हायरसशी वाढ रोखता येऊ शकते. याशिवाय तुमचं श्वसनयंत्र चांगले राहील.
लवंग, मोठी वेलची, दालचीनी, तुळशीची पानं पाण्यात घालून पाणी उकळून घ्या. त्यात तुम्ही चवीसाठी गुळ किंवा साखर घालू शकता. तयार केलेला काढा दोनवेळा गाळून घ्या आणि प्या. एंटीव्हायरल औषधांऐवजी असा घरगुती काढा प्या. जेणेकरून कोरोनाला लांब ठेवता येईल.
लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.
आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.
आरोग्यतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल डिस्टेंसिंग आणि मास्कचा वापर जीवनरक्षकाप्रमाणे आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडत असताना या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यानंतर जेव्हाही कधी तुम्ही बाहेरून घरात येता तेव्हा सगळ्यात आधी बाथरूममध्ये जा. अंघोळ करा आणि ते कपडे धुवायला टाका. असं केल्याने तुम्हाला आणि कुटुंबाला सुद्धा कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तज्ज्ञांच्यामते रात्री झोपण्याआधी तुम्ही या काढ्याचे सेवन केल्यास सुरक्षित राहू शकता.
दिलासादायक! स्वाइन फ्लू च्या औषधाने होणार कोरोना रुग्णांचे उपचार; संशोधकांचा दावा
प्रायव्हेट पार्ट्सवर तीव्रतेने खाज येण्याची 'ही' असू शकतात कारणं; 'अशी' घ्या काळजी