दुर्लक्ष नको! आता वेगळ्या क्रमाने दिसू लागली कोरोनाची लक्षणे, आधी येतो ताप मग सुरू होते अंगदुखी....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 09:38 AM2021-01-15T09:38:03+5:302021-01-15T09:45:50+5:30
भारतातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण काही लोकांना झाली आहे. यादरम्यान कोविड-१९ बाबत वैज्ञानिक रिसर्चही करत आहेत.
जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कोविड-१९ ला रोखण्यासाठी लसीकरण सुरू झालं आहे. भारतातही याची सुरूवात झाली आहे. कोविड-१९ वॅक्सीन येताच लोकांच्या मनात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती बसली. ब्रिटनमध्ये पसरलेला नवा स्ट्रेन जगातील इतरही देशांमध्ये वेगाने पसरत आहे.
भारतातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण काही लोकांना झाली आहे. यादरम्यान कोविड-१९ बाबत वैज्ञानिक रिसर्चही करत आहेत. एक्सपर्टचं मत आहे की, आता व्हायरसमध्ये अनेक बदल झाले आहेत. नव्या केस स्टडीतून समोर आले आहे की, SARS-COV-2 येत्या काळात अधिक घातक होऊ शकतो.
नव्या लक्षणांवर रिसर्च
नोव्हेंबर आणि जानेवारीच्यामधे एक नवीन विश्लेषण समोर आलं आहे की, कोविड १९ ने संक्रमित झालेल्या रूग्णांची लक्षणे आधीपेक्षा वेगळी असू शकतात. तर काहींमध्ये तिच लक्षण असतील. तज्ज्ञांना असं वाटतं की, याच्या सुरूवातीच्या लक्षणांबाबत लोकांमध्ये जागरूकता करायला हवी. यावर लक्ष देण्याची गरज आहे कारण जगभरात ब्रिटनमधील म्यूटेशन वेगाने पसरत आहे.
वैज्ञानिकांनी ५५ हजारपेक्षा अधिक कोविड १९ च्या केसेचा अभ्यास केला. डिसेंबर महिन्यात चीनमध्ये रिपोर्ट करण्यात आलेल्या जवळपास ११०० केसेसवर अतिरिक्त अभ्यास केला गेला. रिसर्चच्या ताज्या रिपोर्टच्या माध्यमातून व्हायरसच्या काही आणखी लक्षणांबाबत सांगत आहोत.
सतत ताप
व्हायरल ताप हा संक्रमणाच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक रिपोर्टमध्ये आढळून आलं आहे की, सतत ताप येणे हेही कोविड-१९ चं एक लक्षण असू शकतं. जास्तीत जास्त लोकांना हलका ताप येतो जो ४ ते ५ दिवसात ठीक होतो. तसेच एखाद्या व्यक्तीवर सूज १० दिवसातही कमी होत नसेल तर त्यांनी लगेच डॉक्टरांना संपर्क साधा. हे कोविड-१९ मुळेही होऊ शकतं.
मांसपेशी दुखणे
कोविड-१९ संक्रमित झालेल्या अनेक लोकांमध्ये मांसपेशींमध्ये वेदना, अधिक सूज आणि शरीरात वेदनासारखी लक्षणे आढळून आलीत. नव्या रिसर्चनुसार, अंगदुखी, पाठदुखी आणि ताप हेही कोविडची लक्षणे असू शकतात. तीव्र सूज व्हायरल इन्फेक्शनचं कारण ठरू शकते. अशात तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.
याप्रकारचा खोकला कोविड-१९ चं लक्षण
रिसर्चमधून समोर आलं आहे की, अनेक रूग्णांमध्ये खोकल्यासोबत छाती जड होणे, कोरड्या खोकल्यासोबत घशात खवखव होणे हेही कोविड १९ ची लक्षणे आहेत. या स्थितीत व्यक्ती दबलेल्या आवाजात बोलतो. तोंडात वेदना होणे आणि काही खाण्यास त्रास होणे हेही एक लक्षण आहे. कोरड्या खोकल्याशिवाय श्वास घेण्यास त्रास आणि छातीत वेदना यांसारख्या समस्याही होऊ शकतात.
डोकं गरगरने
तशी तर डोकेदुखी एक सामान्य समस्या आहे. मात्र, नव्या रिसर्चनुसार अनेक डॉक्टरांनी रूग्णांना डोकेदुखी हलक्यात न घेण्याचा सल्ला दिला आहे. हेही एक कोरोनाचं लक्षण असू शकतं. बेशुद्ध होणे, डोकेदुखी किंवा भ्रम, हृदय किंवा पल्स रेट अस्थिर होणे हेही कोविड १९ ची लक्षणे आहेत.
जुलाब लागणे
पुन्हा पुन्हा जुलाब होत असेल तर हा एक विशेष संकेत आहे की, तुम्ही व्हायरसचे शिकार झाले आहात. जुलाब, भूक न लागणे, वेदना, थकवा आणि डिहायड्रेशन ही कोरोनाची लक्षणे आहेत.