न्यूट्रिशनिस्टनुसार तुम्हीही करत असाल 'या' चुका तर होऊ शकते बद्धकोष्ठतेची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:36 AM2024-06-19T09:36:33+5:302024-06-19T09:36:59+5:30

Causes Of Constipation : बद्धकोष्ठतेची समस्या कशामुळे होते हेही जाणून घेणं महत्वाचं आहे. या समस्येची कारणं जर समजली तर ही समस्या दूर ठेवण्यास लगेच मदत मिळू शकते.

According to a nutritionist don't do these mistakes, you may end up with constipation | न्यूट्रिशनिस्टनुसार तुम्हीही करत असाल 'या' चुका तर होऊ शकते बद्धकोष्ठतेची समस्या

न्यूट्रिशनिस्टनुसार तुम्हीही करत असाल 'या' चुका तर होऊ शकते बद्धकोष्ठतेची समस्या

Causes Of Constipation : वेगवेगळ्या कारणांनी आजकाल बरेच लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येचे शिकार होतात. ही समस्या झाली तर लोकांना मलत्याग करण्यास अडचण होते. या समस्येत लोक बराचवेळ टॉयलेटमध्ये बसून राहतात, पण त्यांचं पोटच साफ होत नाही. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्याचे अनेक उपाय आहेत, पण ही समस्या कशामुळे होते हेही जाणून घेणं महत्वाचं आहे. या समस्येची कारणं जर समजली तर ही समस्या दूर ठेवण्यास लगेच मदत मिळू शकते. बद्धकोष्ठतेची कारणं सांगणारा एक व्हिडीओ न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी शेअर केला आहे. 

बद्धकोष्ठतेची कारणं

फायबर कमी असलेले पदार्थ

जर तुमच्या आहारात फायबर नसलेले पदार्थ असतील किंवा तुम्ही फायबरचं सेवनच करत नसाल तर याने पचनक्रिया हळुवार होते आणि मल कठोर होतं ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते. अशात फायबर असलेल्या पदार्थाचं सेवन करावं.

पाणी कमी पिणे

शरीरात पाणी कमी झालं तर डिहायड्रेशन होतं. ज्यामुळेही बद्धकोष्ठतेची समस्या होते. शरीरात पाणी कमी झालं की, शरीर आतड्यांमधून पाणी खेचू लागतं. अशात दिवसभर भरपूर पाणी प्यावं.

शारीरिक हालचाल न करणे

बरेच लोक एकाच जागी बसून तासंतास काम करतात. काही लोक अजिबात शारीरिक हालचाल करत नाहीत. अशांना बद्धकोष्ठतेची समस्या होते. पायी चालणं, थोडी एक्सरसाइज केली तर ही समस्या दूर होऊ शकते.

चिंता आणि तणाव 

सतत वेगवेगळ्या कारणांची चिंता करणे आणि तणाव घेणे यामुळेही बद्धकोष्ठतेची समस्या होते. अशात चिंता आणि तणाव दूर करण्यावर भर दिला पाहिजे.

हार्मोन्समध्ये असंतुलन

प्रेग्नेंसी, मेनोपोज, थायरॉइड आणि इतरही काही हार्मोनल असंतुलनामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते. 

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी काय खावे?

- चिया सीड्स आणि अळशीच्या बियांमध्ये सोल्यूबल फायबर भरपूर असतं. सोल्यूबल फायबर पाण्यात विरघळतं आणि मल मुलायम करतं. 

- टोमॅटो आणि कोथिंबिरीचा ज्यूस प्यायल्यानेही बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते. काही टोमॅटो घेऊन त्यात कोथिंबिर टाकून ज्यूस तयार करा. यात थोडा चाट मसाला टाका.

- सफरचंदामध्ये भरपूर फायबर असतं. जे तुमची ही बद्धकोष्ठतेची समस्या दूर करू शकतं. 

- रात्री एक ग्लास दुधात एक चमचा तूप मिक्स करून सेवन केल्यास सकाळी पोट सहजपणे साफ होईल. 

- अंजीर, केळी, संत्री खाऊनही तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

Web Title: According to a nutritionist don't do these mistakes, you may end up with constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.