नसांमध्ये चिकटलेलं बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढतं घरातील हे फूल, जाणून घ्या वापराची पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 03:33 PM2022-07-08T15:33:38+5:302022-07-08T15:35:22+5:30

Hibiscus flower for bad Cholesterol : कोलेस्ट्रॉल शरीरात आढळणारा एका मेणासारखा पदार्थ असतो. लिव्हर कोलेस्ट्रॉल तयार करतं, पण सोबत तुमच्याकडून खाल्ल्या गेलेल्या पदार्थांमधूनही याची निर्मिती होते.

According to a study hibiscus flower can reduce bad cholesterol naturally | नसांमध्ये चिकटलेलं बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढतं घरातील हे फूल, जाणून घ्या वापराची पद्धत

नसांमध्ये चिकटलेलं बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढतं घरातील हे फूल, जाणून घ्या वापराची पद्धत

googlenewsNext

Hibiscus flower for bad Cholesterol : कोलेस्ट्रॉल हा शब्द आता बहुतेक सर्वांनाच परिचीत झाला असेल. अनेकजण कोलेस्ट्रॉल वाढलं, त्यामुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या होत असल्याचंही तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल. मुळात कोलेस्ट्रॉल वाढणं ही आज एक कॉमन समस्या बनली आहे. शरीराच्या सामान्य क्रियांसाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. पण याचं प्रमाण वाढलं तर हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर व जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉल शरीरात आढळणारा एका मेणासारखा पदार्थ असतो. लिव्हर कोलेस्ट्रॉल तयार करतं, पण सोबत तुमच्याकडून खाल्ल्या गेलेल्या पदार्थांमधूनही याची निर्मिती होते. बॅड कोलेस्ट्रॉल धमण्यांना आतून चिकटतं. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत आणि वेगाने होत नाही. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो.

कोलेस्ट्रॉल कसं कमी करावं? कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे वेगवेगळे उपाय लोक शोधत असतात. पण ते कमी करण्याचा एक बेस्ट उपाय म्हणजे असे पदार्थ खाणं टाळा ज्याने कोलेस्ट्रॉल वाढतं आणि दुसरं म्हणजे एक्सरसाइज करा. अनेकदा औषधांसोबतच घरगुती उपायही फायदेशीर ठरतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे जास्वंदाचं फूल. चला जाणून घेऊ याचे फायदे...

कोलेस्ट्रॉल कमी करतं जास्वंदाचं फूल

जास्वंदाचं फूल हे अनेक वर्षांपासून जडीबुडी म्हणून वापरलं जातं. ज्याचे आरोग्याला अनेक फायदेही होतात. लाल, गुलाबी, पांढरं आणि केशरी अशा वेगवेगळ्या रंगांचं हे फूल कोलेस्ट्रॉल कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. 

कसं कमी होतं कोलेस्ट्रॉल?

जर्नल ऑफ द सायन्स ऑफ फूड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चरमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जास्वंदाच्या फुलाच्या रसाचा वापर अनेक पेय पदार्थांना रंग देण्यासाठी आणि टेस्टसाठी वापर केला जातो. यात अनेक अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स गुण असतात. ज्यात फ्लेवोनोइड्स, पॉलीफेनोल्स आणि एंथोसायनिन यांचा समावेश असतो. असं मानलं जातं की, हे गुण कोलेस्ट्रॉल कमी करतात. एका रिसर्चनुसार, प्रयोगात ज्या उंदरांना जास्वंदाच्या फुलाचा रस देण्यात आला होता, त्यांचं कोलेस्ट्रॉल कमी झालं होतं.

जर्नल हेल्थ अ‍ॅन्ड फूड इंजिनिअरींगनुसार, जास्वंदाच्या फुलात शरीरासाठी आवश्यक अनेक पोषक तत्व आढळतात. या फुलाता प्रोटीन, व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, आयर्नसारखे पोषक तत्व असतात.

कसा  कराल याचा वापर?

सामान्यपणे जास्वंदाच्या फुलाचा वापर चहाच्या रूपात केला जातो. याचा अर्थ  तुम्ही याचा चहा बनवून पिऊ शकता किंवा गरम पाण्यात उकडून ते पाणी पिऊ शकता. बाजारात जास्वदांचा हर्बल चहाही मिळू शकतो. मात्र, याचा वापर करत असताना एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Web Title: According to a study hibiscus flower can reduce bad cholesterol naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.