आयुर्वेदानुसार स्मरणशक्ती वाढवणारी सगळ्यात बेस्ट वनस्पती, फायदे वाचून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 11:16 AM2024-07-17T11:16:45+5:302024-07-17T11:19:30+5:30
Benefits Of Taking Brahmi Powder: बाजारात मेंदुची क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळी उत्पादने मिळतात. या वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये एका खास गोष्टीचा वापर केला जातो ती म्हणजे ब्राह्मी.
Benefits Of Taking Brahmi Powder: ब्राह्मी आयुर्वेदातील एक फार महत्वाची वनस्पती आहे. या वनस्पतीचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. ब्राह्मीचं तेल केसांसाठी फार फायदेशीर असतं. इतकंच नाही तर याने मानसिक आरोग्यही चांगलं राहतं आणि स्मरणशक्तीही खूप वाढते. मेंदुचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ही वनस्पती खूप फायदेशीर ठरते.
बाजारात मेंदुची क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळी उत्पादने मिळतात. या वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये एका खास गोष्टीचा वापर केला जातो ती म्हणजे ब्राह्मी. तुम्हाला जर स्मरणशक्ती वाढवायची असेल तर याचा वापर करू शकता.
मेंदुची ताकद वाढते
ब्राह्मीच्या सेवनाने मेंदूची ताकद तर वाढतेच पण बुद्धीही तल्लख होते. एकाग्रता वाढवण्यासाठीही ब्राह्मीचा फायदा होतो. ब्राह्मीच्या अर्काचं दररोज सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते.
मेंदुच्या वेगवेगळ्या समस्या होतील दूर
ब्राह्मीचा वापर मेंदुच्या वेगवेगळ्या विकारांना दूर करण्यासाठी केला जातो. एडीएचडीची लक्षणं कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. या डिसऑर्डरमध्ये हायपरएक्टिविटी, इंपल्सिविटी आणि लक्ष केंद्रित न होणे अशा समस्या होतात. लहान मुलांना याने खूप फायदा मिळतो.
तणाव मुक्ती
ब्राह्मीचा सर्वात जास्त फायदा होतो तो तणाव मुक्तीसाठी ब्राह्मीचं सेवन केल्याने मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते. ब्राह्मी हार्मोनल बॅलन्स करते आणि तणाव कमी करण्यात मदत करते. यात कॉर्टिसोलची पातळी कमी करण्याची क्षमता आहे जी स्ट्रेस हार्मोन म्हणूनही ओळखली जाते. ब्राह्मीच्या तेलाने मालिश केल्यास डोक शांत होतं.
ब्लड शुगर नियंत्रित राहते
दररोज ब्राह्मीचं सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि हायपोग्लाइसीमियाची समस्या कमी करण्यात मदत होते.
पचनशक्ती सुधारते
ब्राह्मीच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते. त्यातील फायबर आतड्यांमधून हानिकारक पदार्थ काढून पचनशक्ती मजबूत करते.
कसं करालं याचं सेवन?
ब्राह्मीचं पावडर आयुर्वेदिक औषधी दुकानांमध्ये सहजपणे मिळतं. हे तुम्ही गरम दुधातून, कोमट पाण्यातून किंवा मधासोबत सेवन करू शकता. त्याशिवाय ब्राह्मीचं पावडर उकडत्या पाण्यात टाका नंतर हे पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर सेवन करू शकता. दिवसातून याचं 25-50ml इतक्या प्रमाणात सेवन करावं.