बनाना-मिल्क शेक आरोग्यासाठी ठरू शकतं घातक, जाणून घ्या काय होतं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 10:45 AM2022-07-26T10:45:34+5:302022-07-26T10:46:18+5:30
Health Tips : उन्हाळ्यात बरेच लोक हा शेक पिणं पसंत करतात. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की, केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने आरोग्याला नुकसान पोहोचतं.
Health Tips : चांगल्या आरोग्यासाठी काही अशा गोष्टी हायलाईट करण्यात आल्या आहेत, ज्या आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात. यातीलच एक आहे बनाना मिल्क-शेक. जिम ट्रेनर नेहमीच लोकांना आपल्या डाएटमध्ये बनाना-मिल्क शेकचा समावेश करण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात बरेच लोक हा शेक पिणं पसंत करतात. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की, केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने आरोग्याला नुकसान पोहोचतं.
काय होतं नुकसान?
दूध आणि केळीचं सेवन केल्याने ते मिळत नाहीत, जे तुम्हाला सांगितले जातात. आयुर्वेदानुसार, केळींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि दुधात कॅल्शिअमचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे तुम्ही केळी आणि दुधाचं सेवन एकत्र करू शकत नाहीत. याच्या सेवनाने हार्मोन्सवर गंभीर परिणाम होतो. ज्यामुळे मेंदुही प्रभावित होतो.
काय सांगतं आयुर्वेद?
आयुर्वेदात कोणताही खाण्याचा पदार्थ तरल पदार्थासोबत मिक्स करून खाण्यास मनाई करतं. आयुर्वेदानुसार, केळी आणि दूध हे असंच मिश्रण आहे. ज्याच्या सेवनामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतो. ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स प्रभावित होतात. याच्या सेवनामुळे शरीरात अनेक प्रकारचे आजारही होतात.
प्रेग्नेंट महिलांचंही होतं नुकसान
गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना फार चांगल्याप्रकारे आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही पदार्थांचं सेवन करण्यास मनाई करण्यात येते. अशात तुम्ही लक्ष द्यायला हवं की, तुम्ही काय खावं आणि काय खाऊ नये. बाळाची चांगली काळजी घेण्यासाठी तुम्ही दूध आणि केळीचं एकत्र सेवन करू नये. याच्या एकत्र सेवनाने टॉक्सिन्स प्रमाण वाढतं. याने अॅलर्जीसोबतच अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे बाळावर प्रभाव पडतो.
(टिप - वरील लेखातील सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. यातील सल्ले फॉलो करण्याआधी तज्ज्ञांना एकदा नक्की संपर्क करा.