या लोकांच्या रक्तात अधिक वेगाने वाढतं BAD Cholesterol, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 11:52 AM2022-10-04T11:52:25+5:302022-10-04T11:53:06+5:30

cholesterol : कोलेस्ट्रॉल शरीरातील एक मेणासारखा पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारच असतं. Good cholesterol आणि Bad cholesterol.

According to cdc 5 types of people who is most at risk for high cholesterol | या लोकांच्या रक्तात अधिक वेगाने वाढतं BAD Cholesterol, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

या लोकांच्या रक्तात अधिक वेगाने वाढतं BAD Cholesterol, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

googlenewsNext

शरीरात कोलेस्ट्रॉल (cholesterol) वाढलं तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉल (cholesterol) वाढलं की, तुम्हाला हृदयरोग, नसा आणि धमण्यांचे रोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची समस्या होऊ शकते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि इतर घातक आजार टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे.

कोलेस्ट्रॉल शरीरातील एक मेणासारखा पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारच असतं. Good cholesterol आणि Bad cholesterol. गुड कोलेस्ट्रॉल शरीरातील काही क्रियासाठी महत्वाचं असतं. पण Bad cholesterol ने तुम्हाला नुकसान होऊ शकतं. 

कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशननुसार, तुमची लाइफस्टाईल, तुमची फॅमिली हिस्ट्री यावरून ​कोलेस्ट्रॉलचा धोका समजतो. मद्यसेवन, सिगारेट, जास्त फॅट असलेले पदार्थ, जास्त मसालेदार जेवण, फास्ट फूड, तेलकट पदार्थ यामुळे ​कोलेस्ट्रॉल वाढतं.

कुणाला असतो जास्त धोका

निरोगी आणि जास्त जीवन जगण्यासाठी तुम्हाला रोज कमीत कमी 20 मिनिटे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक्सरसाइज करत नसाल किंवा कोणत्याही फिजिकल अॅक्टिविटीमध्ये सामिल झाले नाही तर तुमच्या रक्तात ​कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका जास्त असतो. सीडीसीनुसार, लठ्ठपणा तुमची ​कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवतो.

स्मोकिंग करणाऱ्यांना जास्त धोका

स्मोकिंगमुळे तुमच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचू शकतं. ज्यामुळे त्यात फॅट जमा होऊ लागतं. स्मोकिंग केल्याने हाय डेंसिटी असलेला लिपोप्रोटीन म्हणजे चांगला कोलेस्ट्रॉल कमी होतो.

​फॅमिली हाइपरकोलेस्ट्रोलेमिया असलेल्या लोकांना

काही लोकांना काही समस्या या फॅमिलीकडून आनुवांशिक स्थितीत मिळतात. ज्याला फॅमिली हाइपरकोलेस्ट्रोलेमिया (FH) म्हटलं जातं. जर वेळीच यावर उपचार केले नाही तर वयानुसार ही स्थिती आणखी बिघडू शकते.

वयही ठरतं महत्वाचं

कोलेस्ट्रॉलचा धोका वयानुसार वाढत जातो. जसजसे तुम्ही मोठे होता, तेव्हा शरीर रक्तातील कोलेस्ट्रॉल तेवढं साफ करू शकत नाही जेवढं तुम्ही कमी वयात करता. 55 वयात महिलांमध्ये पुरूषांच्या तुलनेत खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असतं.

Web Title: According to cdc 5 types of people who is most at risk for high cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.