औषधानेही कफ बाहेर पडत नाहीये? लगेच करा 'हा' सोपा चायनीज उपाय, फुप्फुसं होतील साफ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 02:42 PM2024-10-25T14:42:56+5:302024-10-25T14:45:07+5:30
अनेकदा औषधांनीही काही फरक पडत नाही. अशात छातीत जमा झालेला कफ बाहेर करण्यासाठी एक अनोखा उपाय आम्ही सांगणार आहोत.
सध्या वातावरण बदलामुळे सर्दी-खोकल्याची समस्या अचानक वाढत आहे. या दिवसांमध्ये अनेकांना कफाची समस्या होते. अनेकांच्या छातीत कफ जमा झाल्याने खोकला येतो. यावर लोक वेगवेगळी औषधंही घेतात. पण अनेकदा औषधांनीही काही फरक पडत नाही. अशात छातीत जमा झालेला कफ बाहेर करण्यासाठी एक अनोखा उपाय आम्ही सांगणार आहोत.
एक्यूपंक्चरच्या मदतीने तुम्ही छातीत जमा कफ बाहेर काढू शकता. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला फार काही करायचं देखील नाही. एक सोपी ट्रिक करायची आहे. प्रदुषण, कफ, इन्फेक्शनमुळे फुप्फुसं कमजोर होतात किंवा ब्लॉक होतात. ज्यामुळे मोकळेपणाने खोकताही येत नाही आणि कफही बाहेर येत नाही. खोकला झाला की, घशातही वेदना होते. या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी एक्यूपंक्चरची मदत घेऊ शकता. चीनमध्ये फार पूर्वीपासून हा उपाय केला जातो.
औषधाशिवाय खोकल्यावर उपाय
चायनीज हेल्थ एक्सपर्ट Tianyu Zhang यांनी सांगितलं की, जर घशात खवखव किंवा फार जास्त खोकला उमळून येत असेल तर या समस्या कानाच्या एक्यूपंक्चरने ठीक केल्या जाऊ शकतात. यासाठी दोन्ही कानात हातांचं इंडेक्स फिंगर टाका. आता दोन्ही बोटं आरामात एकत्र फिरवा. एकावेळी 36 वेळा असं करा.
फुप्फुसातील ब्लॉकेज मोकळे होतात.
खोकल्याचं सगळ्यात मोठं कारण श्वासनलिकेत किंवा फुप्फुसात कफ, प्रदुषणाचे कण किंवा काहीतरी अडकणे. ज्यामुळे श्वासाचा मार्ग ब्लॉक होतो. तुमच्या कानांमध्ये खूपसारे एक्यूपंक्चर पॉइंट्स असतात जे फुप्फुसाची क्षमता वाढवतात. याच्या मदतीने फुप्फुसं श्वासनलिका स्वत:च साफ करतात.