कोलेस्टेरॉलसाठी औषधं घेणं सुरू करताय? डायटिशिअनकडून जाणून घ्या गरजेचं आहे की नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:35 IST2025-02-20T15:35:27+5:302025-02-20T15:35:58+5:30
कोलेस्टेरॉल वाढलं तर हृदयरोगांचा धोकाही वाढतो. अशात लोक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वेगवेगळी औषधं खातात.

कोलेस्टेरॉलसाठी औषधं घेणं सुरू करताय? डायटिशिअनकडून जाणून घ्या गरजेचं आहे की नाही!
तुम्ही कधीना कधी आजारी पडल्यावर औषधं घेतली असतीलच. म्हणजे सामान्यपणे हे सगळ्यांनाच माहीत आहे की, आजारी पडल्यावर बरं होण्यासाठी औषधं घ्यावी लागतात. जे आजार मुळापासून बरे केले जाऊ शकत नाहीत, ते आजार कंट्रोल करण्यासाठी काही औषधं दिली जातात. पूर्वी औषधांचा वापर फार कमी केला जात होता. मात्र, आजकाल तर लोकांच्या घरांमध्ये वेगवेगळ्या समस्यांसाठी औषधांचा बॉक्स असतो. पण छोट्या छोट्या समस्यांसाठी सतत औषध घेणं नुकसानकारक असतं.
आजकाल अनेक लोकांना शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या बघायला मिळते. कोलेस्टेरॉल वाढलं तर हृदयरोगांचा धोकाही वाढतो. अशात लोक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वेगवेगळी औषधं खातात. मात्र, डायटिशिअन लवलीन कौर या सांगतात की, तुमच्या रिपोर्टमध्ये जर कोलेस्टेरॉल वाढलेलं आलं असेल आणि तुम्ही औषधं घेणार असाल तर जरा थांबा. थेट औषधं घेण्याआधी तुम्ही ३ गोष्टींचा विचार केला पाहिजे. कदाचित तुम्हाला औषधं घेण्याची गरजही पडणार नाही.
३ गोष्टींवर द्या लक्ष
ट्रायग्लिसराईड
एचडीएल म्हणजे गुड कोलेस्टेरॉल
ट्रायग्लिसराईड आणि एचडीएलला भागीले करून समोर आलेला रेशिओ
औषधाआधी करा हे बदल
डायटिशिअननुसार, जर तुमचा रेशिओ १.५ पेक्षा कमी येत असेल तर याचा अर्थ आहे की, तुमची कार्डिओवस्कुलर हेल्थ ठीक आहे आणि तुम्हाला औषध घेण्याची गरज नाही. जर तुमचा ट्रायग्लिसराईड हाय असेल आणि एचडीएल कमी असेल तर तुम्ही लाइफस्टाईल आणि डाएटमध्ये लगेच बदल करण्याची गरज असते.
डाएटमध्ये काय कराल बदल?
डायटरी चेंजमध्ये हेल्दी फॅट आणि ओमेगा ३ भरपूर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. यासाठी अक्रोड, चिया सीड्स, खोबऱ्याचं केल आणि तुपाचा आहारात समावेश करा.
अॅंटी-इन्फ्लामेटरी फूड
अॅंटी-इन्फ्लामेटरी फूड फार गरजेचे असतात. यासाठी आहारात आले, लसूण आणि हळदीसोबत काळी मिरीचा समावेश करा. काळी मिरीमधील पायपरिन हळदीमधील करक्यूमिनचा वापर वाढवतं.