सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टींचं करावं सेवन? डायटिशिअनने दिला खास सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:23 AM2024-08-14T11:23:59+5:302024-08-14T11:35:57+5:30
डायटिशिअन किरण कुकरेजा यांनी सकाळी रिकाम्या पोटी काय खाणं फायदेशीर ठरेल याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Healthy Foods: रात्री जेवण केल्यानंतर सकाळपर्यंत अन्न पचतं आणि सकाळी पोटही साफ होतं. अशात सकाळी रिकाम्या पोटात काय जातं हेही फार महत्वाचं आहे. जर सकाळी काही अॅसिडिक पदार्थ पोटात गेले तर अॅसिडिटीची समस्या होते, काही चटपटीत खाल्लं तर पोटदुखीची समस्या होते किंवा जुलाब लागू शकतात. अशात सकाळी पोट रिकामं असताना काय खायला हवं याची काळजी घेतली पाहिजे. डायटिशिअन किरण कुकरेजा यांनी सकाळी रिकाम्या पोटी काय खाणं फायदेशीर ठरेल याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पदार्थांचं सेवन करून तुम्ही पचन तंत्र चांगलं ठेवू शकता, त्वचा चांगली ठेवू शकता आणि केसही मजबूत करू शकता.
रिकाम्या पोटी काय खावं?
ताजं खोबरं
डायटिशिअननुसार, नारळामध्ये आढळणारे हेल्दी फॅट्स स्किन बॅरिअरला रिपेअर करण्यास मदत करतात. तसेच याने शरीरातील इन्फ्लेमेशनही कमी होतं. रोज सकाळी ओल्या नारळाचा एक किंवा दोन तुकडे खाल्ल्याने तुम्हाला खूपसारे फायदे मिळतील.
ताज्या भाज्यांचा ज्यूस
ताज्या भाज्या आपण नेहमीच खातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, ताज्या भाज्यांच ज्यूस प्यायल्यानेही शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. ताज्या भाज्यांच्या ज्यूसमध्ये फायबर भरपूर असतं. जे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं. तसेच शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास याने मदत मिळते. रोज एक ग्लास, काकडीचा ज्यूस, दुधी भोपळ्याचा ज्यूस, कोथिंबिरीचा ज्यूस रिकाम्या पोटी सेवन करू शकता.
सफरचंद
रोज सकाळी एक सफरचंद खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. याच भरपूर फायबर, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि हेल्दी फॅट असतं. जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. रोज सफरचंद खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते.
रिकाम्या पोटी काय खाऊ नये?
एक्सपर्ट नेहमीच रिकाम्या पोटी काही गोष्टींचं सेवन न करण्याचा सल्ला देतात. कारण याने आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. यात कॉफी, चहा यांचाही समावेश आहे. तसेच सकाळी काही चटपटीत खाल्लं तर अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. आंबट फळं, कार्बोनेटेड ड्रिंक्स, गोड पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड्सचं देखील रिकाम्या पोटी सेवन करू नये.