तोंडाची दुर्गंधी आहे या गंभीर आजारांचा संकेत, आयुर्वेद डॉक्टरने सांगितले काही खास उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 01:00 PM2022-07-16T13:00:15+5:302022-07-16T13:03:31+5:30
Bad Breath Tips: आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं, जास्त फळं-भाज्या खायला हव्यात.
Bad Breath Tips: तोंडाची दुर्गंधी येणं ही अनेकांना होणारी समस्या आहे. ही समस्या दात आणि आतड्यांचं आरोग्य बिघडल्याने, अॅसिडीटीमुळे, मधुमेहामुळे, फुप्फुसाच्या संक्रमणामुळे किंवा इतकंच काय तर पाणी कमी प्यायल्यानेही होऊ शकते. त्यासोबतच दातांना रोज ब्रश न केल्याने तोंडात बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. सोबतच धुम्रपान करणं आणि तंबाखू खाणं यामुळेही तोंडाची दुर्गंधी येते. बऱ्याच दिवसांपासून तोंडाची दुर्गंधी येत असेल तर हा पेरिडोंटल किंवा हिरड्यांच्या आजाराचा संकेत असू शकतो.
आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं, जास्त फळं-भाज्या खायला हव्यात. तसेच शुगरयुक्त पदार्थ खाणं टाळलं आणि तंबाखूयुक्त पदार्थ खाणं टाळलं तर तोंडाची दुर्गंधी दूर होऊ शकते. डॉ.भावसार यांनी 5 टिप्स सांगितल्या आहेत ज्याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर केली जाऊ शकते.
दिवसातून दोन वेळा ब्रश करा
सकाळी ब्रश केल्याने आणि जीभ स्वच्छ केल्याने रात्रभर तोंडात जमा झालेले विषारी पदार्थ नष्ट करण्यास मदत मिळते. जर तुम्ही रात्रीही झोपण्याआधी ब्रश केला आणि जीभ स्वच्छ केल्याने तोंड स्वच्छ राहतं. तुम्ही एका स्वच्छ तोंडासोबत झोपता. याने पोटाचं आरोग्यही चांगलं राहतं.
जेवणानंतर बडीशेप खा
बडीशेपमध्ये पचनसाठी आवश्यक गुण असतात आणि यात फ्लेवोनोइड्स असतात. याने लाळेचा प्रवाह उत्तेजित करण्यात मदत मिळते. ज्याने तोंड कोरडंही होत नाही. सोबतच बडीशेपचा सुगंधीत स्वाद तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतो.
जेवणानंतर गुरळा करा
डॉक्टर दीक्षा यांनी सांगितलं की, आयुर्वेदात जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण याने तुमचं चयापचय स्लो होतं. पण तोंडाच्या स्वच्छतेसाठी खासकरून जेवणांनंतर पाणी गरजेचं आहे. जेवणानंतर 2 ते 3 मिनिटे पाण्याने गुरळा करा. याने दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण निघतात. हे कणं नंतर दातांना किड लागण्यास कारणीभूत ठरतात.
भरपूर पाणी प्या
शरीराचं प्रत्येक कार्य खासकरून तोंडांच्या आरोग्यासाठी पाणी फार गरजेचं आहे. तुम्ही किती पाणी प्यावं याबाबत डॉ. भावसार यांनी सांगितलं की, लघवीचा रंग हलका पिवळा असेल तर याचा अर्थ होतो की, तुमच्या शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण आहे. जर लघवीचा रंग जास्त पिवळा असेल तर तुम्हाला भरपूर पाणी प्यावं लागेल.