बेडवर पडता पडता येईल तुम्हाला चांगली झोप, डॉक्टरांनी दिला खास सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:32 AM2024-05-21T11:32:54+5:302024-05-21T11:33:18+5:30
अनेक रिपोर्ट्समधून समोर आलं आहे की, दर पाचपैकी एका व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही. अशात डाएटमध्ये कोणते बदल करून चांगली झोप घेता येईल हे अनेकांना माहीत नसतं.
आजकाल वाढती चिंता, उशीरा जेवणं करणं, योग्य आहार न घेणं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांना झोप न येण्याची समस्या होते. अनेक रिपोर्ट्समधून समोर आलं आहे की, दर पाचपैकी एका व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही. अशात डाएटमध्ये कोणते बदल करून चांगली झोप घेता येईल हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही सांगणार आहोत. डॉ. मायकल मोस्ले जे 800 डाएट बनवण्यासाठी फेमस आहे. ते नेहमीच आरोग्याबाबत वेगवेगळ्या टिप्स देत असतात. त्यांनी झोप येत नसल्यामुळे काय नुकसान होतात हेही सांगतात. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत झोप चांगली लागणाऱ्या फूड्सबाबत सांगितलं आहे.
डॉ. मायकल यांनी सांगितलं की, 'पुरेश झोप न झाल्याने दुसरा दिवस तर खराब होताच सोबतच आरोग्यासंबंधी इतर समस्याही होतात. जेव्हा आपण चांगली झोप घेतो तेव्हा मेंदुतील अनेक भाग अॅक्टिव होतात. पण असं झालं नाही तर वेगवेगळ्या समस्या होतात. पण काही अशाही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते'.
डॉ. मायकल यांच्यानुसार, मेडिटेरिअन डाएट घेतल्याने तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत मिळू शकते. याने चांगली झोप तर येईलच सोबतच अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, या डाएटने हृदयरोग, कॅन्सर, टाइप 2 डायबिटीसही कमी होतो आणि आयुष्य वाढतं.
डॉक्टरांनी लोकांना ऑलिव्ह ऑइल खाण्याचा सल्ला दिला आहे. हे ऑइल हेल्दी फॅटपैकी एक आहे. यात अनेक पॉलीफेनोल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे सूज कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.
अंडी नियमित खाल्ल्याने तुम्हाला फायदा मिळू शकतो. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि हाय क्वालिटी प्रोटीन असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि लिपिड प्रोफाइलमध्येही सुधारणा होते.
तसेच ते म्हणाले की, नट्स खाल्ल्यानेही फायदा मिळतो. यांमध्ये पोषक तत्व भरपूर असतात. इतकंच नाही तर नट्सने एनर्जी वाढते. कारण यात हेल्दी आणि हळुवार बर्न होणारं ऑइल असतं. यात पोट चांगलं ठेवणारे बरेच फायबरही असतात.