रात्रभर भिजवून हे फळ खाल्लं तर वेगाने वाढेल रक्त आणि हाडेही होतील मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:47 AM2022-08-17T11:47:47+5:302022-08-17T11:48:26+5:30

प्रसिद्ध डायटिशिअन शिखा अग्रवा शर्मा यांनी सांगितलं की, जर तुम्हाला नेहमी निरोगी रहायचं असेल तर 6 काळे मनुके घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी प्या.

According to expert 6 amazing health benefits of eating soaked black raisins | रात्रभर भिजवून हे फळ खाल्लं तर वेगाने वाढेल रक्त आणि हाडेही होतील मजबूत

रात्रभर भिजवून हे फळ खाल्लं तर वेगाने वाढेल रक्त आणि हाडेही होतील मजबूत

Next

ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यांमध्ये ते सगळे पोषक तत्व असतात जे शरीराचा मजबूत करतात. असं मानलं जातं की, काही ड्राय फ्रूट्स भिजवून खाल्ल्याने अधिक फायदा होतो. काळे मनुके हे असेच ड्राय फ्रूट्स आहेत. जे भिजवून खाल्ल्याने दातांना मजबूत करण्यापासून ते हाडांना मजबूत करण्याचं काम करतात. 

प्रसिद्ध डायटिशिअन शिखा अग्रवा शर्मा यांनी सांगितलं की, जर तुम्हाला नेहमी निरोगी रहायचं असेल तर 6 काळे मनुके घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी प्या. काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. हेच कारण आहे की, हे भिजवून खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर कमी होतं, एनीमिया दूर राहतं आणि अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळतात.

बद्धकोष्ठता आणि पाइल्सवर उपाय

भिजलेल्या काळ्या मनुक्यांमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे याचे शरीराला वेगवेगळे फायदे होतात. यातील हाय फायबरमुळे मलत्याग करण्यास मदत होते आणि पोटाची समस्या जसे की, बद्धकोष्ठचाही कमी होते.

वजन कमी करण्यास फायदेशीर

कोणताही पदार्थ ज्यात फायबर भरपूर प्रमाणात असतं त्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे जेव्हाही तुम्ही फळं आणि भाज्या खाता किंवा फायबर असलेले पदार्थ खाता तेव्हा तुमचं पोट बराच वेळ भरलेलं राहतं. याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि आयर्न

असं मानलं जातं की, आपल्या देशात जवळपास 70 टक्के लोक एनीमिक आहेत. आणि हा एक चिंताजनक विषय आहे. अशात काळ्या मनुके शरीरातील आयर्नची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात.

हाडे होतात मजबूत

काळे मनुके हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खासकरून ऑस्टिओपोरोसिसने पीडित लोकांना याचा जास्त फायदा होतो. त्याशिवाय काळ्या मनुक्यांमध्ये बोरानचं प्रमाणही अधिक असतं. हे एक हाय कॅल्शिअम असलेलं खनिज आहे आणि हाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

हाय ब्लड प्रेशर होतं कंट्रोल

हाय ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी काळे मनुके खावेत. कारण यात पोटॅशिअमचं प्रमाण अधिक असतं. हे हाय कोलेस्ट्रॉल, हाय ट्रायग्लिसराइड आणि हृदयरोग असलेल्या लोकांसाठी अधिक फायदेशीर आहे.

तोंडाची दुर्गंधी होते दूर

जर तुमच्या तोंडाची दुर्गंधी येत असेल यातही काळे मनुके तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. काळे मनुके खाल्ले किंवा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचं पाणी प्यायले तर याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर होऊ शकते. याने तुमचा अनेक संक्रमणापासून बचाव होतो.

Web Title: According to expert 6 amazing health benefits of eating soaked black raisins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.