दूध-दही नसेल आवडत तर कॅल्शिअमसाठी खा या पालेभाज्या, हाडे-दात होतील मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 04:27 PM2023-12-04T16:27:39+5:302023-12-04T16:28:15+5:30

शरीरातील 99 टक्के कॅल्शिअम हाडांमध्ये जमा असतं आणि बाकीचं 1 टक्के रक्त, मांसपेशी आणि इतर उतकांमध्ये असतं.

According to Harvard health add these 5 leafy vegetables in your diet to beat calcium deficiency and make your bones strong | दूध-दही नसेल आवडत तर कॅल्शिअमसाठी खा या पालेभाज्या, हाडे-दात होतील मजबूत

दूध-दही नसेल आवडत तर कॅल्शिअमसाठी खा या पालेभाज्या, हाडे-दात होतील मजबूत

शरीराच्या चांगल्या कार्यासाठी ज्याप्रमाणे आयरन आणि प्रोटीनसारख्या पोषक तत्वांची गरज असते. ठीक त्याचप्रमाणे कॅल्शिअमही फार महत्वाचं तत्व आहे. कॅल्शिअम एक मिनरल आहे जे हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी महत्वाचं आहे. त्याशिवाय ब्लड क्लॉट आणि नर्वस सिस्टममध्ये सुधारणा करण्यासाठी आणि हार्ट रेट नॉर्मल करण्यासाठीही फायदेशीर आहे. शरीरातील 99 टक्के कॅल्शिअम हाडांमध्ये जमा असतं आणि बाकीचं 1 टक्के रक्त, मांसपेशी आणि इतर उतकांमध्ये असतं.

कॅल्शिअम गरजेचं का?

कॅल्शिअमची कमतरता झाल्याने हाडे कमजोर आणि नाजूक होतात. म्हणजे याची कमी झाली तर ऑस्टियोपोरोसिस नावाचा आजार होऊ शकतो. याच्या कमतरतेमुळे मांसपेशींमध्ये कमजोरी होऊ शकते. इतकंच नाही तर कॅल्शिअम कमी झालं तर तुम्हाला थकवा, दातांची समस्या, रक्ताचा आजार, नखं कमजोर होणं, विचार करण्याची क्षमता कमजोर होणं इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो.

कॅल्शिअम कसं मिळवाल? 

असं मानलं जातं की, कॅल्शिअम दूध आणि दह्यासारख्या डेअरी उत्पादनांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. पण रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही भाज्यांमध्येही याचं प्रमाण भरपूर असतं. हिवाळ्यात मिळणाऱ्या काही भाज्यांमध्ये कॅल्शिअम भरपूर असतं.

रोज किती कॅल्शिअमची गरज

हार्वर्ड हेल्थनुसार, 19 ते 50 वर्षाच्या महिलांनी कॅल्शिअमसाठी रोज 1 हजार मिली ग्रॅम आणि 19-70 वर्षाच्या पुरूषांना रोज 1 हजार मिलीग्रॅम कॅल्शिअमची गरज असते.

कॅल्शियम आणि तुमचं आरोग्य

कॅल्शिअमची कमी आणि याचं फार जास्त सेवन या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी धोकादायक आहे. कॅल्शिअमची कमी झाली झाली तर अनेक समस्या होऊ शकतात. अशात कॅल्शिअम असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे. त्याशिवाय कॅल्शिअमच्या सप्लीमेंट्सही येतात, ज्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. कॅल्शिअम कमी झाल्यावर खालील समस्या होऊ शकतात.

- ब्लड प्रेशर

- कार्डियोवस्कुलर डिजीज

- हाडांसंबंधी विकार

- कोलोरेक्टल कॅन्सर

- किडनी स्टोन

कोणत्या भाज्या खाव्यात

- सलजम

- मोहरीची पालेभाजी

- केलभाजी

- पालक

-  बोक चॉय

कॅल्शिअमची कमतरता कशी भरून काढाल

हार्वर्ड हेल्थनुसार, कॅल्शिअम केवळ दूध आणि इतर डेअरी उप्तादनांमध्येच नाही तर रोज खाल्ल्या जाणाऱ्या अनेक खाद्य पदार्थांमध्येही असतं. फळं, पालेभाज्या, शेंगा, ड्राय फ्रूट्स आणि काही स्टार्च असलेल्या भाज्यांमध्ये हे असतं.

कॅल्शियमचे मुख्य स्रोत

- दूध, बदाम, सोया, तांदळाचं दूध

- पनीर

- दही

- हिरवे सोयाबीन
 

Web Title: According to Harvard health add these 5 leafy vegetables in your diet to beat calcium deficiency and make your bones strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.