किचनमधून बाहेर फेका या 2 गोष्टी, कोलेस्ट्रॉलमुळे येणार नाही Heart Attack ची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 01:57 PM2023-12-05T13:57:02+5:302023-12-05T13:57:41+5:30
चिंतेची बाब ही आहे की, लोक आजारी असूनही डाएट आणि लाइफस्टाईलची काळजी घेत नाही. ज्यामुळे ही समस्या गंभीर बनत आहे.
जर तुमचं रक्तातील कोलेस्ट्रॉल वेगाने वाढत असेल तर नक्कीच तुम्हाला डॉक्टरांनी औषधांसोबतच हेल्दी डाएट घेण्याचा आणि एक्सरसाइज करण्याचा सल्ला दिला असेल. कारण हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या बनत आहे. ज्यामुळे हार्ट डिजीज, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
चिंतेची बाब ही आहे की, लोक आजारी असूनही डाएट आणि लाइफस्टाईलची काळजी घेत नाही. ज्यामुळे ही समस्या गंभीर बनत आहे. आजकाल जास्तीत जास्त लोक कोलेस्ट्रॉल मॅनेज करण्यासाठी औषधांचा आधार घेतात. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, तुमच्या जीवनात थोडा बदल करूनही तुम्ही बॅड कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. हार्वर्ड हेल्थने याबाबत काही सल्ले दिले आहेत.
ट्रान्स फॅट आणि सॅचुरेटेड फॅट टाळा
ट्रान्स फॅटमुळे हार्ट डिजीज होण्याचे अनेक पुरावे आहेत. त्याप्रमाणेच सॅचुरेटेड फॅटही हृदयासाठी चांगलं नाही. तुम्ही अंड्यातील बलक, तेल, तूप, लोणी, लाल मांस, फॅटी मासे, फॅट असलेलं पनीर इत्यादींचं सेवन टाळलं पाहिजे किंवा कमी प्रमाणात केलं पाहिजे.
पॉलीअनसॅचुरेटेड आणि मोनोअनसॅचुरेटेड फॅट खा
पॉलीअनसॅचुरेटेड आणि मोनोअनसॅचुरेटेड फॅटी अॅसिड दोन्ही एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. कॅनोला, कुसुम, सुर्यफुल, ऑलिव्ह ऑइल, द्राक्ष यांच्या बीया आणि फल्ली तेलासहीत इतरही प्लांट बेस्ड तेलांमध्ये हे फॅट असतं.
रंगीबेरंगी फळं-भाज्यांचं सेवन करा
फळं आणि भाज्यांमध्ये असे अनेक तत्व असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करतात. ज्यात फायबर सगळ्यात महत्वाचं आहे. यात स्टेरोल्स आणि स्टॅनोलसारखे तत्वही असतात. जे डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवतात. त्याशिवाय पालेभाज्या, गाजर, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, प्लम, ब्लूबेरी इत्यादींचं सेवन करा.
साखर आणि मैदा बाहेर फेका
कडधान्यांमध्ये फायबर भरपूर असतं. रिफाइंड पीठ म्हणजे मैदा आणि पांढऱ्या तांदळाऐवजी गव्हाचं पीठ वापरावं. दलिया सुद्धा एक चांगला पर्याय आहे. साखरचं सेवन टाळावं. सारखेमुळे कोलेस्ट्रॉल तर वाढतंच सोबतच ब्लड शुगर आणि डायबिटीसचा धोकाही वाढतो.