Cancer Early Sign: हे 5 लक्षण सांगतात की, तुम्हाला होणार आहे कॅन्सर; स्टेज एकमध्ये जाण्याआधी वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 12:41 PM2023-02-06T12:41:07+5:302023-02-06T12:41:43+5:30
Cancer Early Sign: कॅन्सरची लक्षण आणि संकेत याची ओळख सुरूवातीला पटली तर कॅन्सर आणखी वाढण्यापासून रोखण्यास मदत मिळते. तसेच योग्य उपचार घेण्यासही मदत मिळते.
Cancer Early Sign: आज जगभरात वर्ल्ड कॅन्सर डे (World Cancer Day) पाळला जात आहे. या दिवसाचा उद्देश या जीवघेण्या आणि भयंकर आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवणं आहे. कॅन्सरचं नाव ऐकताच सगळेच घाबरतात आणि याचं एक मोठं कारण म्हणजे या आजाराबाबत माहिती नसणं हे आहे.
एक्सपर्ट्स सांगतात की, कॅन्सरची लक्षण वेळीच ओळखली तर चांगले उपचार घेता येतात. दुर्दैवाने कॅन्सरची बरीच लक्षण सुरूवातीला कळून येत नाहीत आणि जेव्हा समजतात तेव्हा बराच उशीर झालेला असतो. हेच कारण आहे की, डॉक्टर आणि एक्सपर्ट कॅन्सरच्या हलक्या लक्षणांवरही बारकाईने लक्ष देण्यास सांगतात.
कॅन्सरची लक्षण आणि संकेत याची ओळख सुरूवातीला पटली तर कॅन्सर आणखी वाढण्यापासून रोखण्यास मदत मिळते. तसेच योग्य उपचार घेण्यासही मदत मिळते. कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे त्यांची लक्षणही वेगवेगळी असतात. आम्ही तुम्हाला कॅन्सरच्या अशा काही सुरूवातीच्या लक्षणांबाबत सांगणार आहोत, ज्याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नये.
1) विनाकारण वजन कमी होणं
hopkinsmedicine ने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, काहीच कारण नसताना वजन कमी होत असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जायला हवं. जर काही दिवसांमध्ये तुमचं वजन 10 पाउंड आणि 4.5 किलो किंवा त्यापेक्षा कमी झालं असेल तर वेळीच सावध व्हा कारण काही केसेसमध्ये हा कॅन्सरचा पहिला संकेत असतो.
2) थकवा येणे
दिवसभर काम करून झाल्यावर येणारा थकवा कॉमन आहे. पण कॅन्सरचा थकवा वेगळाच असतो. जर तुम्ही पुरेसा आराम करूनही तुम्हाला सतत थकवा किंवा कमजोरी जाणवत असेल, जी जात नाही तर हा कॅन्सरचा संकेत असू शकतो. कॅन्सर शरीरात पसरण्यासाठी शरीरातील पोषक तत्वांचा वापर करतो आणि हेच कारण आहे की, शरीराला पुरेसे पोषक तत्व मिळत नाहीत आणि तुम्हाला सतत थकवा जाणवतो.
3) तापही आहे कॅन्सरचा संकेत
वातावरणात बदल झाला की, ताप येणं ही एक सामान्य बाब आहे. हा ताप दोन किंवा तीन दिवसात बरा होतो. पण तुम्हाला पुन्हा पुन्हा ताप येत असेल तर हा तुम्ही कॅन्सरचे शिकार होत असल्याचा संकेत आहे. कॅन्सरचा ताप जास्तकरून रात्रीच्या वेळी येतो. जर तुम्हाला कोणतं इन्फेक्शन नसेल आणि घामासोबत ताप येत असेल तर हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
4) वेदना होणे
शरीरात वेदना वेगवेगळ्या कारणांनी होत असते आणि वेदना आराम केल्यावर तसेच औषधं घेतल्यावर दूर होते. पण जर तुम्हाला सतत वेदना होत असेल तर हा संकेत आहे की, तुमच्या शरीरात काहीतरी गडबड आहे. कॅन्सरमध्ये वेदना वेगवेगळ्या कारणाने होते, जसे की, ट्यूमर ज्यामुळे शरीरात अनेक भागात दबाव बनतो आणि त्यामुळे वेदना होते. कॅन्सर रसायन रिलीज करतं ज्यामुळेही वेदना होते.
5) त्वचेचा रंग किंवा बनावट बदलणं
शरीराची त्वचा वेगवेगळ्या कारणांनी प्रभावित होते. काविळ एक लक्षण आहे जे संक्रमण किंवा कॅन्सरचा संकेत देऊ शकतं. काविळचं कोणतंही लक्षण दिसल्यावर डॉक्टरांना संपर्क करा. त्वचेवर असलेले तीळ किंवा चामखीळीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. यात काही बदल झाला तर डॉक्टरांना दाखवा.
कसा कराल बचाव?
mayoclinic नुसार, अनेक गोष्टींची काळजी घेतल्यावर कॅन्सरचा धोका तुम्ही कमी करू शकता. सगळ्यात आधी जर तुम्हाला वरील लक्षण जाणवत असतील तर वेळ न घालवता टेस्ट करा. त्याशिवाय तंबाखूचं सेवन बंद करा. नेहमीच पालेभाज्या आणि फळांचं सेवन करा. वजन कमी करा आणि जास्त कमी झालं तर डॉक्टरांना भेटा. नियमित मेडिकल चेकअप करा.