कोलेस्ट्रॉल मुळापासून नष्ट करतात या गोष्टी, हार्ट अटॅकचा धोका होईल दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 03:37 PM2023-07-07T15:37:59+5:302023-07-07T15:38:17+5:30
Cholesterol Reducing Foods: कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे की, तुम्ही नियमितपणे काय खाता आणि पिता. जास्तीत जास्त लोक आजकाल बाहेरचं तेलकट खूप खातात, फास्ट फूड खातात आणि गोड पेयांचं सेवन करतात.
Cholesterol Reducing Foods: कोलेस्ट्रॉल वाढणं हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत आहे. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका अधिक असतो. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही.
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे की, तुम्ही नियमितपणे काय खाता आणि पिता. जास्तीत जास्त लोक आजकाल बाहेरचं तेलकट खूप खातात, फास्ट फूड खातात आणि गोड पेयांचं सेवन करतात. ज्यांमध्ये जास्त अनसॅच्युरेटेड फॅट भरलेलं असतं. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या डाएटवर लक्ष दिलं पाहिजे.
डाइटीशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांनी काही अशा पदार्थांबाबत सांगितलं ज्याने तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. हे जर फॉलो केलं तर कोलेस्ट्रॉल वाढणार नाही आणि तुम्हाला हार्ट अटॅकचाही धोका कमी होईल.
ऑलिव्ह ऑइल
लोण्याची टेस्ट खूप चांगली लागते. पण लोण्यामध्ये सॅच्यरेटेड फॅट भरपूर असतं. जे हृदयासाठी नुकसानकारक असतं. कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी याऐवजी ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. यात हेल्दी फॅट असतं.
नट्स खा
चिप्स, फ्रेंच फ्राइज, चटपटीत आणि बिस्किटाचं सेवन जास्तीत जास्त लोक करतात. यांमध्ये अनहेल्दी फॅट भरलेलं असतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल वेगाने वाढतं. जास्त काळ याचं सेवन केलं तर हृदसाठी घातक ठरू शकतं. त्याऐवजी मुठभर शेंगदाणे खा. फायबर आणि प्रोटीन असलेले शेंगदाणे हृदयासाठी चांगले ठरतात.
तांदळाऐवजी क्विनोआ
भात दररोज सगळ्याच घरांमध्ये खाल्ला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, भातामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हलवर प्रभाव पडतो. त्याऐवजी क्विनोआ खाऊ शकता. हे कडधान्य प्रोटीनसहीत अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. तुम्ही पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन तांदुळ खाऊ शकता.
डार्क चॉकलेट खा
जर तुम्ही नेहमीच मिल्क चॉकलेट खात असाल तर तुमच्या हृदयाला नुकसान होऊ शकतं. जास्त प्रमाणात साखर आणि फॅट कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवतं. त्याऐवजी डार्क चॉकलेट खाऊ शकता.