दुप्पट फायदे मिळवण्यासाठी लसणाचं या पद्धतीने करा सेवन, वैज्ञानिकांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 12:03 PM2024-06-04T12:03:27+5:302024-06-04T12:06:36+5:30
How to eat garlic : ब्लड शुगर आणि हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. लसणाबाबत असा दावा चीन अभ्यासकांनी 'Nutrients' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये केला आहे.
How to eat garlic : लसणाचा वापर आयुर्वेदात अनेक वर्षांपासून औषधी म्हणून केला जातो. लसणामुळे वेगवेगळ्या पदार्थांची चव तर वाढतेच सोबतच याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. लसणाचे शरीराला इतके फायदे मिळतात की, ते लोकांना माहीतही नसतात. लसणाच्या सेवनाने हृदय निरोगी राहतं. ब्लड शुगर आणि हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. लसणाबाबत असा दावा चीन अभ्यासकांनी 'Nutrients' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये केला आहे.
आजकाल चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लोकांना वेगवेगळ्या समस्या होत आहेत. यात शुगर आणि फॅट वाढण्याची समस्या जास्त बघायला मिळते. यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतता. पण या औषधांमुळे केवळ या समस्यांची लक्षणं कमी होतात. आतून या औषधांचे अनेक साइड इफेक्ट्स होतात. लसणामध्ये एलिसिन नावाचं तत्व आढळतं जे रक्तात शुगर आणि फॅट संतुलित ठेवण्यास मदत करतं.
कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस दोन्ही समस्यांना सायलेंट किलर म्हटलं जातं. अशात या रिसर्चमध्ये लसणाच्या माध्यमातून शुगर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कशी कमी होणार हे सांगितलं आहे.
लसणाचं कसं केलं सेवन?
अभ्यासकांनी सांगितलं की, लसूण पावडर, कच्चा लसूण, लसणाचं तेल, लसणाचा जुना अर्क आणि लसणाचे सप्लीमेंट्स यांचं सेवन केल्याने तुम्हाला फायदा मिळू शकतो. यांचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं.
शुगर आणि फॅटसाठी किती प्रभावी?
अभ्यासकांनी लसणाच्या सेवनामुळे रक्तातील शुगर आणि फॅटच्या लेव्हलवर पडणाऱ्या प्रभावाचं विश्लेषण केलं. त्यानंतर असं आढळून आलं की, रिकाम्या पोटी रक्तातील शुगरचं प्रमाण की करण्यासाठी लसूण फायदेशीर ठरतो.
लसणाची पोषक तत्व
लसणांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्ससारखे पोषक तत्व भरपूर असतात. तसेच लसणामध्ये व्हिटॅमिन बी1, बी6, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर असतात. त्यासोबतच मॅगनीज, सेलेनियम, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि फॉस्फोरससारखे मिनरल्सही भरपूर असतात.
लसूण खाण्याची योग्य पद्धत
लसणाचं सेवन करण्याची योग्य पद्धत सांगणारे अनेक व्हिडीओ इन्स्टावर व्हायरल होत असतात. ज्यात एक्सपर्ट किंवा आयुर्वेदिक डॉक्टर लसूण खाण्याची योग्य पद्धत सांगतात जेणेकरून लसणाचे सगळे फायदे तुम्हाला मिळायला हवेत. असाच एक व्हिडीओ डॉक्टर सलीम झैदी यांनी शेअर केला आहे.