वीकेंडला दोन दिवस करा 'हे' एक काम, शरीरातून कोलेस्ट्रॉल येईल बाहेर आणि रक्तप्रवाह होईल सुरळीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 01:29 PM2024-09-03T13:29:57+5:302024-09-03T13:31:05+5:30
Weekend Walking Benefits : आठवडाभर कामाच्या घाईमुळे तुम्ही एक्सरसाईज करू शकत नसाल तर अशात तुम्ही आठवडाभराची एक्सरसाईज या दोन दिवसात थोडा वेळ देऊन करू शकता.
Weekend Walking Benefits : शनिवारी आणि रविवारी अनेक लोकांना सुट्टी असते. हे दोन दिवस तुमच्याकडे आराम करण्यासाठी, वेगवेगळी कामे करण्यासाठी बराच वेळ असतो. मात्र, या दोन दिवसातील थोडा वेळ एका खास कामासाठी दिला तर तुम्ही अनेक आजारांना तुमच्यापासून दूर ठेवू शकता.
आठवडाभर कामाच्या घाईमुळे तुम्ही एक्सरसाईज करू शकत नसाल तर अशात तुम्ही आठवडाभराची एक्सरसाईज या दोन दिवसात थोडा वेळ देऊन करू शकता. नेचर एजिंगमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, वीकेंड वर्कआउट करून तुम्ही मेंदू हेल्दी ठेवू शकता. दोन दिवसात तुम्ही 150 मिनिटांच टारगेट पूर्ण करू शकता. कारण शरीरात यात फरक करू शकत नाही की, तुम्ही वर्कआउट आठवडाभर केला की दोन दिवसात.
JAMA नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जे लोक आठवड्यातून दोन दिवस रोज 8 हजार पावलं चालतात त्यांचं हृदय निरोगी राहू शकतं आणि अकाली निधनाचा धोका टाळला जाऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही आठवडाभर बिझी राहत असाल तर दोन दिवस आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक्सरसाईज करू शकता.
डिमेंशियाचा धोका होईल कमी
वीकेंडला घरात बसून जास्त खाणं किंवा झोपण्यापेक्षा तुम्ही पायी चालण्याचं टारगेट पूर्ण करू शकता. कारण याने तुमचं शरीर आणि मेंदू दोन्हींना फायदा मिळेल. रिसर्चनुसार, जे लोक अजिबात एक्सरसाईज करत नाहीत, त्यांच्या तुलनेत वीकेंडला एक्सरसाईज करणाऱ्या लोकांना डिमेंशिया, ब्रेन स्ट्रोक, पार्किंसंस डिजीज, चिंता आणि डिप्रेशनचा धोका कमी होतो.
हार्ट हेल्थ
पायी चालणं ही सगळ्यात चांगली हार्ट एक्सरसाईज आहे. जी तुम्ही दिवसभर कधीही करू शकता. शरीराची चालून हालचाल केली तर हृदय मजबूत होतं आणि ब्लड सर्कुलेशनही सुधारतं. तसेच पायी चालल्याने कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरही कमी होतं. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.
चांगली झोप येईल
पायी चालल्याने चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत मिळते. सकाळी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने सर्कैडिअन रिदम चांगला होतो. कारण याने झोपताना आवश्यक हार्मोन मेलाटोनिन रिलीज होतं.
मसल्स आणि बोन हेल्थ
फार जास्त वेळ बसून राहिल्याने हाडं आणि मांसपेशींचं नुकसान होतं. अशा सुस्त जीवनशैलीमुळे टाळण्यासाठी पायी चालणं सुरू करा. चालण एक चांगला व्यायाम मानला जातो. ज्यामुळे हाडांचं आरोग्य सुधारतं.
हेल्दी एजिंग
निरोगी हृदय, मेंद, शरीर आणि तणाव कमी करण्यासोबतच चालण्याने अनेक आजारांचा धोका कमी करता येतो. त्यामुळे रोज किंवा आठवड्यातून दोन दिवस काही वेळ चालण्याची सवय लावावी.