'या' कॅन्सरमुळे महिलांपेक्षा पुरूषांचा जास्त होतो मृत्यू, जाणून घ्या याची कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 05:41 PM2022-07-18T17:41:08+5:302022-07-18T17:41:21+5:30
Skin Cancer : स्कीन कॅन्सर महिलांच्या तुलनेत पुरूषांना सर्वात जास्त प्रभावित करतो. हा आजार स्कीन सेल्स असामान्य रूपाने वाढल्याने होतो. स्कीन कॅन्सर तीन प्रकारचे असतात.
Skin Cancer : हे तर सत्यच आहे की, महिला त्यांच्या त्वचेबाबत फार सजग असतात. त्यामुळे अनेकांना वाटतं की, स्क्रीन कॅन्सर हा महिलांना होणारा आजार आहे. पण सत्य हे नाहीये. खरं तर हे आहे की, स्कीन कॅन्सर महिलांच्या तुलनेत पुरूषांना सर्वात जास्त प्रभावित करतो. हा आजार स्कीन सेल्स असामान्य रूपाने वाढल्याने होतो. स्कीन कॅन्सर तीन प्रकारचे असतात. ज्यात बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि मेलेनोमा यांचा समावेश आहे.
यातील मेलेनोमा हा कॅन्सर सर्वात घातक मानला जातो. नुकसानकारक यूवी किरणांच्या संपर्कात आल्याने मेलेनोमा हा आजार होतो. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये मेलोनोमा विकसित होण्याची शक्यता जास्त असते आणि जसजसे ते मोठे होतात धोका वाढत जातो. त्यामुळे पुरूषांनी या कॅन्सरपासून जास्त सावध राहण्याची गरज आहे.
काय सांगते आकडेवारी
2012 ते 2016 तील आकडेवारीनुसार, अमेरिकेत दरवर्षी मेलेनोमाच्या जवळपास 77,697 केसेस आढळल्या. यातील पुरूषांची संख्या 45,854 होती आणि महिलांची संख्या 31,845 होती. डेटामधून आढळून आलं की, गोऱ्या रंगाच्या पुरूषांचा मृत्यू गोऱ्या रंगाच्या महिलांच्या तुलनेत दुपटीने त्वचा कॅन्सरने झाला आहे. भारतात दरवर्षी मेलेनोमाच्या 10 हजारांपेक्षा जास्त केसेस आढळतात. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या 2021 च्या रिपोर्टनुसार, भारतात इतर देशांपेक्षा आणि कॅन्सरपेक्षा स्कीन कॅन्सरच्या केसेस कमी आहेत.
जर्नल ऑफ कॅन्सर रिसर्च अॅन्ड थेरेप्यूटिक्समध्ये प्रकशित रिसर्चनुसार, भारतातील पॉप्युलेशन बेस्ड कॅन्सर रजिस्ट्रीच्या आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं. त्यात आढळलं की, स्कीन कॅन्सरशी संबंधित सर्वात जास्त केसेस भारताच्या पूर्वोत्तरमध्ये आहेत. तज्ज्ञांचं मत आहे की, उत्तर आणि पूर्व भारतात स्कीन कॅन्सरच्या जास्तीत जास्त केसेस गंगा बेसिनसोबत आर्सेनिकच्या संपर्कात आल्याने समोर येतात.
स्कीन कॅन्सरची कारणे
त्वचा यूवी रेडिएशनच्या संपर्कात येणे - डॉक्टरांचं मत आहे की, त्वचा सूर्याच्या नुकसानकारक यूवी रेडिएशन आणि टॅनिंग लॅम्पच्या संपर्कात येणं मेलेनोमाचं मुख्य कारण आहे.
कॅन्सर रिसर्च यूकेला आढळून आली की, सर्व्हेमध्ये सहभागी केवळ एक चतुर्थांशपेक्षाही कमी पुरूष उन्हापासून स्वत:चा बचाव करणं गरजेचं समजत नाहीत. तर एका चतुर्थांश पुरूषांनुसार सन प्रोटेक्शन तेवढं गरजेचं नाही. 23 टक्के म्हणाले की, सूर्यापासून बचाव करणं गरजेचं नाही. सत्य तर हे आहे की, दर दोन वर्षात केवळ एकदा सनबर्न झाल्यानेही त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका तीन पटीने वाढू शकतो.
हाय एस्ट्रोजन लेव्हलही आहे एक कारण
रिसर्चमधून समोर आलं की, हाय एस्ट्रोजन स्तर असलेल्या लोकांमध्ये मेलेनोमाचा धोका वाढतो. महिला योग्यपणे उपचार घेतात, त्यामुळे स्कीन कॅन्सरपासून त्यांची बचावाची शक्यता जास्त असते.
माहितीची कमतरता
स्कीन कॅन्सरची कोणतीही खास लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे लोक त्वचेवरील सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पुरूषांमध्ये मेलेनोमा जास्तीत जास्त खांदे किंवा पाठीवर होतो.