कशाचाही विचार न करता Paracetamol खाण्याआधी जाणून घ्या नुकसान, जीवाला होऊ शकतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:05 AM2024-02-24T11:05:35+5:302024-02-24T11:06:06+5:30

पॅरासिटामोलमुळे तुमच्या लिव्हरला नुकसान पोहोचू शकतं. याच्या जास्त वापराने ऑर्गन फेलिअरची समस्याही होऊ शकते.

According to study paracetamol overdose poses severe risk of liver failure | कशाचाही विचार न करता Paracetamol खाण्याआधी जाणून घ्या नुकसान, जीवाला होऊ शकतो धोका

कशाचाही विचार न करता Paracetamol खाण्याआधी जाणून घ्या नुकसान, जीवाला होऊ शकतो धोका

तुम्हीही शरीरात वेदना होत असेल किंवा ताप आला असेल तर कशाचाही विचार न करता स्वत:च्या मनाने पॅरासिटामोलचं सेवन करता का? जर उत्तर होण असेल तर वेळीच सावध व्हा. एडिनबर्ग विश्वविद्यालयाच्या एका शोधानुसार, पॅरासिटामोलमुळे तुमच्या लिव्हरला नुकसान पोहोचू शकतं. याच्या जास्त वापराने ऑर्गन फेलिअरची समस्याही होऊ शकते.

एडिनबर्ग विश्वविद्यालयातील शोधककर्त्यांनुसार, जेव्हा पॅरासिटामोलचा डोज उंदरांना देण्यात आला तेव्हा त्यांच्यावर नकारात्मक प्रभाव आढळून आला. रिझल्टमधून समजलं की, काही परिस्थितींमध्ये पॅरासिटामोल लिव्हरमध्ये कोशिकांच्या कामकाजासाठी आवश्यक क्रियांना प्रभावित करू शकतं. याने लिव्हरचं नुकसान होतं.

पॅरासिटामोलचा किती डोज सुरक्षित

हेल्थ एक्सपर्टही मानतात की, जर पॅरासिटामोलचा डोस सांगण्यात आलेल्या डोजपेक्षा जास्त घेतला, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतला, अल्कोहोलसोबत घेतला किंवा लिव्हरच्या खास कंडिशनसाठी घेतला गेला तर लिव्हर डॅमेजचा धोका असतो. डॉक्टरही सांगतात की, तसं तर हे औषध सुरक्षित आहे, पण 24 तासात 8 पेक्षा जास्त टॅबलेट खाऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाऊ नये.

मोठी समस्याही होऊ शकते

हेल्थ एक्सपर्ट हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका असणाऱ्या रूग्णांनाही पॅरासिटामोलचं सेवन कमी करण्याचा सल्ला देतात. Healthdirect नुसार, जास्त काळ पॅरासिटामोलचं सेवन केल्याने आरोग्यासंबंधी गंभीर समस्या होऊ शकते. 

थकवा 

दम लागणे

बोटं आणि ओठांचं रंग निळा होणे

एनीमिया, लिव्हरमध्ये समस्या

हाय बीपी असेल तर हृदयरोग स्ट्रोकचा धोका

Web Title: According to study paracetamol overdose poses severe risk of liver failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.