काळ्या रंगाचे पदार्थ ठेवतील तुमचं आरोग्य उत्तम, 'या' उपाचरपद्धतीमध्ये विशेष माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 04:40 PM2022-08-19T16:40:22+5:302022-08-19T16:44:58+5:30

तज्ज्ञांच्या मते, अनेक काळे पदार्थ अर्थात ब्लॅक फूड (Black Food) हे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये काळे तीळ, काळी द्राक्षं आदींचा समावेश आहे.

according to Tibetan treatment black food is extremally beneficial for health | काळ्या रंगाचे पदार्थ ठेवतील तुमचं आरोग्य उत्तम, 'या' उपाचरपद्धतीमध्ये विशेष माहिती

काळ्या रंगाचे पदार्थ ठेवतील तुमचं आरोग्य उत्तम, 'या' उपाचरपद्धतीमध्ये विशेष माहिती

googlenewsNext

किडनी (Kidney) हा शरीरातल्या प्रमुख अवयवांपैकी एक महत्त्वाचा अवयव (Organ) आहे. ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचं काम किडनी करते. किडनी हा शरीरातला फिल्टर (Filter) मानला जातो. रक्तातले विषारी घटक युरिनच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. तसंच शरीरातल्या रसायनांची पातळी संतुलित ठेवण्यास किडनी मदत करते. त्यामुळे किडनीचं आरोग्य (Health) उत्तम असणं गरजेचं आहे.

बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, ताण-तणाव आदी कारणांमुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. डायबेटीसमुळेदेखील किडनीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर किडनीचं आरोग्य उत्तम राहावं, यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मते, अनेक काळे पदार्थ अर्थात ब्लॅक फूड (Black Food) हे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये काळे तीळ, काळी द्राक्षं आदींचा समावेश आहे. `हेल्थ शॉट्स डॉट कॉम`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अमेरिकेतल्या 'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन पबमेड'ने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक फूड किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी हितावह असतात. यासाठी रॅंडम क्रॉस ओव्हर स्टडी करण्यात आला. सुकी काळी फरसबी, सुके काळे मसूर यांचे नियमित सेवन केल्यास कॉर्डिओ व्हॅस्क्युलर डिसीज (Cardiovascular Disease) होण्याची शक्यता कमी होते आणि अनेक आजारांपासून किडनी सुरक्षित राहते.

धरमशाला येथील मिलारेपा हे तिबेटमधल्या (Tibet) पर्यायी चिकित्सा पद्धतीचा वापर करतात. मिलारेपा यांच्या मते, किडनीचा रंग काळा असतो. त्यामुळे काळ्या पदार्थांचे सेवन केल्यास किडनीचे विकार होत नाहीत. गडद काळ्या, गडद निळ्या किंवा गडद जांभळ्या रंगाच्या अन्नात अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर किंवा अन्य गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून (Free Radicals) पेशींचं संरक्षण होतं.

  • काळ्या द्राक्षांमधले (Black Grapes) ल्युटिन आणि जॅक्सेन्थिन हे घटक किडनीसाठी लाभदायक असतात. तसंच त्यातलं प्रोअँथोसायनिडिन त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं.
  • काळ्या उडीद डाळीत कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, फोलेट आणि झिंक हे घटक असतात. यामुळे शरीराची ऊर्जा पातळी वाढते, तसंच किडनीचं आरोग्य उत्तम राहतं.
  • काळ्या तांदळात (Black Rice) आयर्न अर्थात लोह मुबलक असते. यामुळे Anemiaसारखे विकार होत नाहीत. यात अँथोसायनिन आणि जॅक्सोन्थिनम असे अँटीऑक्सिडंट (Antioxidant) असल्याने हे तांदूळ किडनीसाठी फायदेशीर मानले जातात.
  • काळ्या तिळात (Black Sesame) फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम, झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन-ई मुबलक असतं. त्यातला सेसमिन हा घटक अँटी इन्फ्लेमेटरी असतो. काळे तीळ नियमित सेवन केल्यास किडनीचं आरोग्य उत्तम राहतं.


आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. रंजित यादव यांनी सांगितलं, ``काळ्या पदार्थांमध्ये अँथोसायनिन नावाचे रंगद्रव्य आढळतं. यामुळे काही पदार्थ काळे, निळे आणि जांभळ्या रंगाचे दिसतात. अशा वनस्पती उत्पादनांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक असते. यामुळे किडनी निरोगी राहण्यास मदत होते.``

परंतु, या पदार्थांच्या अतिसेवनामुळे नुकसान होऊ शकतं. शेंगांमध्ये कॉम्प्लेक्स शुगर ऑलिगोसॅकराइड्स असतात. त्यात अत्यावश्यक एंझाइम अल्फा गॅलॅक्टोसिडेस आढळत नाही. त्यामुळे ते लवकर पचत नाहीत.

वांग्याचं अतिसेवन टाळावं, असा सल्ला डॉ. रंजीत देतात. ``वांग्यात ऑक्सलेट असते. यामुळे किडनी स्टोन (Kidney Stone) होण्याचा धोका असतो. वांगी, टोमॅटोमध्ये बिया असतात. त्या ऑक्सलेट आणि कॅल्शियमचा स्रोत असतात. हे घटक मूत्रमार्गात जमा होतात आणि त्याचं रूपांतर किडनी स्टोनमध्ये होतं. त्यामुळे हे पदार्थ टाळावेत,`` असा सल्ला डॉ. रंजीत यादव यांनी दिला आहे.

Web Title: according to Tibetan treatment black food is extremally beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.