WHO ने सांगितलं निरोगी जगण्यासाठी काय खावे, काय खाऊ नये? वाचाल तर रहाल फायद्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:10 IST2024-08-26T10:38:05+5:302024-08-26T11:10:46+5:30
Healthy Tips: जर व्यक्तीचा आहार पौष्टिक नसेल आणि लाइफस्टाईल अॅक्टिव नसेल तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.

WHO ने सांगितलं निरोगी जगण्यासाठी काय खावे, काय खाऊ नये? वाचाल तर रहाल फायद्यात...
Healthy Tips: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO नुसार पौष्टिक आहार घेतल्याने शरीरात कोणत्याही पोषक तत्वांची कमी होत नाही. तसेच डायबिटीस, स्ट्रोक आणि हृदयरोगांचा आजारही टाळला जातो. जर व्यक्तीचा आहार पौष्टिक नसेल आणि लाइफस्टाईल अॅक्टिव नसेल तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.
अशात WHO कडून वेळोवेळी लोकांना आहारासंबंधी गाइडलाईन शेअर केल्या जातात. ज्यात काय खावं आणि काय खाऊ नये याबाबत सांगितलं जातं. आज अशाच एका गाइडलाईनबाबत तुम्हाला सांगणार आहोत.
WHO नुसार हेल्दी डाएट
WHO च्या फूड गाइडलाईननुसार, एका वयस्क व्यक्तीने आपल्या आहारात फळं, भाज्या, डाळी, ड्राय फ्रूट्स आणि कडधान्यांचा समावेश केला पाहिजे.
- आहारात रोज भाज्यांचा समावेश करावा. ताजी फळं किंवा ताज्या हिरव्या कच्च्या भाज्यांना स्नॅक्स म्हणून खाल्लं पाहिजे. जी सीझनल फळं किंवा भाज्या असतात त्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. यांमधून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.
- दिवसभर सामान्यपणे एक चमचा मिठाचं सेवन केलं पाहिजे. ज्या मिठाचं सेवन करत असाल ते आयोडाइज्ड असलं पाहिजे. जास्त मीठ खाऊ नये.
- आहारामध्ये ट्रान्स फॅट्सचा समावेश करणं टाळलं पाहिजे. ट्रान्स फॅट मीट, बेक्ड, तळलेले पदार्थ, पॅक्ड फूडमध्ये असतं. याने हृदयरोगाचा धोका खूप वाढतो.
- ज्या गोष्टी उकडून आणि स्टीम करून खाल्ल्या जाऊ शकतात त्या फ्राय करून खाणं टाळलं पाहिजे.
- लोणी आणि तूपाऐवजी पॉलीसॅच्युरेटेड फॅट्स असलेल्या तेलाचा वापर करता येऊ शकतो. जसे की, सोयाबीन, कॉर्न आणि सूर्यफूलाचं तेल.
- फास्ट फूड, जंक फूड, डोनट, बर्गर, पिझ्झा यांचं सेवन कमी केलं पाहिजे. या पदार्थांमुळे हृदयरोग, डायबिटीसचा धोका जास्त असतो. कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोकाही जास्त असतो.
- जास्त प्रमाणात शुगरचं सेवन केल्याने डायबिटीस आणि लठ्ठपणाचा धोका खूप जास्त वाढतो. अशात शुगर सेवन कमी करण्यावर भर दिला पाहिजे. कार्बोनेटेड ड्रिंक्स, स्पॉर्ट्स ड्रिंक्स, रेडी टू ड्रिंक चहा आणि फ्लेवर्ड मिल्कमध्ये शुगर जास्त असते.