Acidity दूर करण्याचे खास 7 घरगुती उपाय, एकदा कराच मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 05:49 PM2022-08-26T17:49:39+5:302022-08-26T17:50:16+5:30

Acidity : काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पचनासंबंधी समस्या दूर करू शकता. हे उपाय तुम्ही मसाल्याचे किंवा तेलाचे पदार्थ खाल्ल्यावर झालेल्या डॅमेजला सुधारण्याचं काम करतात.

Acidity : How to avoid acidity, these 7 post meal tips work miraculously | Acidity दूर करण्याचे खास 7 घरगुती उपाय, एकदा कराच मग बघा कमाल!

Acidity दूर करण्याचे खास 7 घरगुती उपाय, एकदा कराच मग बघा कमाल!

googlenewsNext

Acidity : भारतीय पदार्थांमध्ये तेल आणि मसाले भरपूर टाकले जातात आणि हे पदार्थ हवे तेवढे खाल्लेही जातात. आपल्यापैकी अनेक लोक पोटाच्या आरोग्यापेक्षा जिभेचे चोचले पुरवण्यावर जास्त भर देतात. अशात या लोकांच्या शरीरात गॅस, पोटात जळजळ, अ‍ॅसिडिटी, पोटदुखी अशा आजारांना घर करण्यास जागा मिळते. या समस्या लग्नाचा सीझन आणि उन्हाळ्यात अधिक वाढतात. अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमच्या पचनासंबंधी समस्या दूर करू शकता. हे उपाय तुम्ही मसाल्याचे किंवा तेलाचे पदार्थ खाल्ल्यावर झालेल्या डॅमेजला सुधारण्याचं काम करतात.

जेवणानंतर कोमट पाणी - जर तुम्हाला वाटत असेल की, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर सकाळी तुम्हाला जुलाब होऊ नये तर जेवणानंतर कोमट पाणी नक्की प्यावं. कोमट पाण्याने पचनक्रिया वेगाने आणि सहजपणे होते.

चहा, कॉफी नाही तर ग्रीन टी फायदेशीर - जेवणानंतर चहा किंवा कॉफीचं सेवन करणं फायदेशीर असतं. यात फ्लेवोनोइड भरपूर प्रमाणात असतं, जे पचनक्रियेत ऑक्सीडेटिव लोडला संतुलित करण्यासाठी अ‍ॅंटीऑक्सीडेंट बनवतं.

दही अ‍ॅसिडिटीमध्ये आहे फायदेशीर - आयुर्वेदात जेवण केल्यानंतर दही खाण्याचा सल्ला दिला जातो. दह्यातसोबत भाजलेलं जीरं पचनक्रियेला बूस्ट करतं. दह्यात असलेल्या प्रोबायोटिक्स लॅक्टोबेसिलस बॅक्टेरिया अ‍ॅसिडिटीला कमी करण्यासोबतच आतड्यांना अन्न पचवण्यास मदत करतं.

फायबरने पोट राहतं साफ - जास्त तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाल्ल्यानंतर हलकं आणि फायबरयुक्त जेवण पोटासाठी आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. फायबरयुक्त आहार पोटाची सफाई करण्यास मदत करतं. तसेच तेलकट खाल्ल्यानंतर पचनक्रियेचं झालेलं डॅमेजही कंट्रोल करतं. अशात दलिया आणि ओट्सचं सेवन करावं.

ड्रायफ्रूट्सचं करा सेवन - काजू, बदाम, पिस्ता, शेंगदाणे, किशमिश, खजूर, सुपारीसारखे ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं. याने पचनक्रिया मजबूत करण्यास मदत मिळते.

ओव्याने पोट राहतं थंड - ओव्याचं पाणी जेवण केल्यानंतर गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा घरगुती उपाय आहे. ओवा थंड असतो. कोमट पाण्यात एक चमचा ओवा टाकून सेवन केल्यास पचनसंबंधी समस्या दूर होतात.

Web Title: Acidity : How to avoid acidity, these 7 post meal tips work miraculously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.