अभिनेता गुरमीत चौधरीनं दीड वर्षापासून चपाती, भात, ब्रेड खाणं सोडलं; जाणून घ्या रूटीन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:30 IST2025-01-07T15:29:20+5:302025-01-07T15:30:11+5:30
Gurmeet Choudhary : अनेक वेब सीरीजमध्येही त्यानं काम केलं. नुकताच त्याचा 'ये काली काली ऑंखे' सीझन २ हा शो नेटफ्लिक्सवर आलाय.

अभिनेता गुरमीत चौधरीनं दीड वर्षापासून चपाती, भात, ब्रेड खाणं सोडलं; जाणून घ्या रूटीन!
Gurmeet Choudhary : गुरमीत चौधरी मालिक आणि सिने विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे. छोट्या पडद्यापासून त्यानं आपल्या करिअरची सुरूवात केली होती आणि अनेक शोमध्येही त्यानं काम केलं. 'रामायण' मालिकेनं त्याला खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्याची पत्नी अभिनेत्री देबीना शोमध्ये सीता बनली होती. नंतर 'खामोशिया'मधून त्यानं मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. अनेक वेब सीरीजमध्येही त्यानं काम केलं. नुकताच त्याचा 'ये काली काली ऑंखे' सीझन २ हा शो नेटफ्लिक्सवर आलाय.
अभिनेत्यांना लोकांच्या मनात जागा मिळवण्यासाठी आणि आपली भूमिका चांगला निभावण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आपली भूमिका निभावण्यासाठी कलाकार डिमांडनुसार, वेगवेगळ्या डाएट फॉलो करतात. नुकताच गुरमीतनं त्याच्या डाएटबाबत सांगितलं.
गुरमीत म्हणाला की, "मला वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात. पण गेल्या दीड वर्षांपासून मी चपाती, साखर, ब्रेड किंवा भात यातील काहीच खाल्लेलं नाही. हे अजिबात सोपं नाही. कोणत्याही भूमिकेसाठी तुम्हाला स्वत:ला मानसिक रूपानं तयार करावं लागतं. गेल्या दीड वर्षापासून एकप्रकारचंच उकडलेलं जेवण करत आहे. त्याला काहीच टेस्ट नसते. पण आता हळूहळू मला ते टेस्टी लागत आहे. आता माझी भूक इतकी वाढली आहे की, काही अनहेल्दी खाल्लं तर ते मला अजिबात आवडणार नाही. यापुढे जाऊन मी तूप खाऊ शकतो. मात्र, तेही जास्त खाल्लं तर शरीरात अॅक्सेप्ट करत नाही". त्यानं पुढे सांगितलं की, "मी रात्री ९.३० वाजता झोपतो आणि सकाळी ४ वाजता उठतो".