16 तासांचा उपवास अन् स्ट्रिक्ट डाएट; नक्की कसं केलं राम कपूर यांनी 30 किलो वजन कमी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 11:15 AM2019-07-11T11:15:14+5:302019-07-11T11:16:38+5:30
राम कपूर यांच्या वाढलेल्या वजनाच्या चर्चांनी जोर धरला होता. पण सध्या राम कपूर त्यांच्या वेट लॉस ट्रांसफॉर्मेशनमुळे चर्चेत आले आहेत.
टेलिव्हिजन विश्वामधील गाजलेल्या मालिकांमधील एक मालिका म्हणजे, 'बडे अच्छे लगते है'. राम कपूर आणि साक्षी तन्वर या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. खरं तर अभिनेते राम कपूर यांच्या करिअरला वेगळी दिशा दिली असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. या मालिकेपासूनच राम कपूर यांच्या वाढलेल्या वजनाच्या चर्चांनी जोर धरला होता. पण सध्या राम कपूर त्यांच्या वेट लॉस ट्रांसफॉर्मेशनमुळे चर्चेत आले आहेत. 2 दिवसांपूर्वी राम कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपला सेल्फी पोस्ट केला असून यामध्ये राम कपूर फार बारिक झालेले दिसत आहेत. एकेकाळी गोलमटोल दिसणारे राम कपूर यांना आता ओळखणंही कठिण जात आहे.
फॅट ते फिट झाले राम कपूर
नवभारत टाइमसने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास 2 वर्षांपूर्वी राम कपूर यांनी वयाच्या 45व्या वर्षी स्वतःला फिट अन् हेल्दी ठेवण्याचा निश्चय केला होता. त्यासाठी त्यांनी आपलं डाएट आणि स्ट्रिक्ट जिम रूटिन फॉलो करण सुरू केलं होतं. सध्या 130 किलो वजन असणाऱ्या राम कपूर यांनी आपलं 30 किलो वजन कमी केलं आहे. एवढचं नाहीतर त्यांना आणखी 25 ते 30 किलो वजन घटवण्याची इच्छा आहे.
जिममध्ये हेव्ही वेट ट्रेनिंग करतात राम कपूर
राम कपूर यांच्या वर्कआउट रूटिनबाबत सांगायचे तर, सकाळी उठल्यानंतर ते सर्वात आधी आपल्या वर्कआउटसाठी थेट जिममध्ये जातात. जिममध्ये जाण्याआधी ते काहीही खात नाहीत. तसेच साकळच्या वेळी ते जिममध्ये हेव्ही वेट ट्रेनिंग करतात. रात्री झोपण्यापूर्वी ते इंटेंस कार्डियो वर्कआउट करतात.
वेट लॉससाठी intermittent fasting
वेट लॉससाठी डाएटिंगवरही लक्ष देतात राम कपूर. ते जवळपास 16 तासांसाठी फास्टिंग करतात आणि आपल्या डाएटमधून ते किती कॅलरी घेतात याकडेही लक्ष देतात. फॅटपासून फिट होण्यासाठी राम कपूर यांनी intermittent fasting ची मदत घेतली आहे. या प्रकारच्या डाएटिंगमध्ये तुम्ही काय खावं आणि काय नाही याकडे फोकस करण्याऐवजी कधी खावं याकडे जास्त फोकस करण्यात येतो. यामध्ये फास्टिंग दरम्यान तुम्ही काहीही खाऊ शकत नाही. एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, फास्टिंग दरम्यान तुम्ही पाणी, कॉफी यांचं सेवन करू शकता.
प्रत्येक दिवशी 16 तासांसाठी उपाशी राहतात राम कपूर
राम कपूर यांनी intermittent fasting ची पद्धत निवडली आहे. यामध्ये ते प्रत्येक दिवशी 16 तासांसाठी फास्टिंग करण्यात येते. म्हणजेच, यादरम्यान ते काहीही खात नाहीत. फक्त दिवसभरामध्ये संध्याकाळी 7 ते 8 च्या दरम्यानचं खाण्याचा सल्ला त्यांना तज्ज्ञांनी दिला आहे.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.