काय आहे आलिया भट्टचं स्लिम आणि फिट असण्याचं गुपित? जाणून घ्या उत्तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 11:30 AM2019-11-08T11:30:01+5:302019-11-08T11:30:23+5:30
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते. ती इतकी स्लिम आणि फिट कशी राहते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते. ती इतकी स्लिम आणि फिट कशी राहते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अनेकांना याबाबत प्रश्न पडतात, त्याचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आलियाने सांगितले की, ती नेहमी घरचं जेवण खाते आणि तिला डाळ-भात जास्त आवडतो.
आलियाने सांगितलेकी, 'घरचं जेवण सर्वात चांगलं राहतं. मला आठवतं की, जेव्हाही माझी आई माझ्यासाठी पास्ता करायची तेव्हा मी तिला डाळ-भात मागत असे. एक आहार म्हणून मी नेहमीच डाल-भाताच्या फार जवळ आहे आणि मला हे फार आवडतं'.
खिचडी आहे आलियाचं कम्फर्ट फूड
(Image Credit : indiatimes.com)
आलिया म्हणाली की, 'माझं कम्फर्ट फूड खिचडी, फ्रेंच फ्राइज आणि डाळ-भात आहेत. हेल्थ फूड म्हणून मला भाज्या आणि कार्बोहायड्रेट्सचं संतुलित सेवन करावं लागतं. त्यासोबतच मला फळंही आवडतात'.
एक्सरसाइजवरही लक्ष देते आलिया
स्वत:ला इतकी फिट कशी राहते असे विचारले असता आलिया म्हणाली की, 'माझ्या डेली रूटीनमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. मी कधी पायलेट्स करते तर कधी स्मीमिंग किंवा बॅडमिंटन खेळते. माझं असं मत आहे की, दररोज शारीरिक रूपाने सक्रिय राहणे फार आवश्यक आहे. जेव्हा व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढणं कठीण असेल तर हे गरजेचं असतं'.
घरच्या जेवणाचे फायदे
फूड पॉयजनिंगपासून बचाव
घराच्या स्वच्छ किचनमध्ये जेवण तयार केलं जातं. त्यामुळे आपल्याला हेल्थी आहार मिळतो. याने फूड पॉयजनिंगसारख्या समस्यांपासूनही आपण दूर राहतो.
प्रिझर्वेटिव्ह नसलेला आहार
घरच्या जेवणात प्रिझर्वेटिव्ह्स नसतात. हीच घरच्या जेवणाची सर्वात मोठी खासियत असते. असं जेवण आपल्या शरीराला पोषण देतं, याने वजन कमी करण्यासही मदत होते आणि तुम्ही हेल्दी राहता.
पोषक तत्वांनी भरपूर घरचं जेवण
घरच्या जेवणात डाळ, भाज्या, चटणी, दही आणि दूध यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. याप्रकारे प्रोटीन, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेटसारखे महत्वपूर्ण तत्व मिळवण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे घरचं जेवण हा आहे.