विद्या बालन 'या' आजाराने ग्रस्त; जाणून घ्या सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 08:07 PM2019-01-03T20:07:07+5:302019-01-03T20:19:15+5:30

चित्रपट सृष्टी आणि अभिनेते, अभिनेत्री जेवढ्या पडद्यावर खुश दिसतात तेवढ्या त्या वैयक्तीक आयुष्यात असतातच असं नाही. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनाही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, जसं एखादा सामान्य माणूस करत असतो.

Actress vidya balan obsessive compulsive disorder ocd mental diseases | विद्या बालन 'या' आजाराने ग्रस्त; जाणून घ्या सविस्तर!

विद्या बालन 'या' आजाराने ग्रस्त; जाणून घ्या सविस्तर!

googlenewsNext

चित्रपट सृष्टी आणि अभिनेते, अभिनेत्री जेवढ्या पडद्यावर खुश दिसतात तेवढ्या त्या वैयक्तीक आयुष्यात असतातच असं नाही. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनाही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, जसं एखादा सामान्य माणूस करत असतो. बॉलिवूडची सुंदर आणि चुलबुली अभिनेत्री विद्या बालन ओसीडी म्हणजेच ऑब्सेसिव कंपल्सिव डिसॉर्डर नावाच्या एका मानसिक आजाराने ग्रस्त आहे. हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला पुन्हा नॉर्मल होण्यासाठी फार वेळ लागतो. या आजारामध्ये व्यक्तीला कोणतंही एक काम करण्याची सवय लागते. त्यामुळे ती व्यक्ती सतत तेच काम करत राहते. एवढचं नव्हे तर त्या व्यक्तीच्या मनात सतत त्याच गोष्टींबाबत विचार येत असतात. 

ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर हा आजार होण्यासाठी आनुवंशिकता, ब्रेनमध्ये सेरोटोनिन नावाचा न्यूरोट्रान्समीटरच्या कमतरतेमुळे, इन्फेक्शन, ताण इत्यादी गोष्टींसाठी कारणीभूत असतात. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनलाही आपल्या आजुबाजूला स्वच्छता हवी असते. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना आपल्या आजूबाजूला जराशीही धूळ, माती दिसली तर तिच्या मेंदूतील नेगेटिव्ह हॉर्मोन्स अॅक्टिव्ह होतात. त्यामुळे त्यांना अॅलर्जी होण्याची भिती वाटते. 

जर कधी त्या एखादं काम करत असेल तरी ते तिच्या लक्षात राहत नाही. अनेकदा ती विचारात पडते की, तिने हे काम नक्की केलं की नाही. जसं की, घरातून बाहेर पडताना त्याचा दरवाजा व्यवस्थित बंद केला आहे की नाही. किंवा लाइट आणि पंख्याचे स्विच बंद केले आहेत की नाही. यांसारखे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होत असतात. पण अनेकदा या व्यक्ती फक्त एवढ्यावरच थांबत नाहीत. त्या व्यक्ती सतत त्या शंका उपस्थित करतच असतात. अनेकदा या प्रश्नांमुळे या व्यक्ती सतत अस्वस्थ राहतात. अशा विचलित मनस्थितीला ऑब्सेसिव कम्पलसिव डिसऑर्डर किंवा ओसीडी म्हटलं जातं. हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

ओब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर ची लक्षणं :

- सतत स्वच्छता राखणं आणि धूळीला घाबरणं. ओसीडीमुळेच त्या व्यक्तीमध्ये स्वच्छता आणि सतत हात धुण्याची वृत्ती वाढते.
 
- सतत शंका उपस्थित करण्याची वृत्ती वाढल्यामुळे व्यक्ती सतत नेगेटिव्ह विचार करत असते. 

- हिशोब मांडताना किंवा गोष्टी व्यवस्थित ठेवताना समस्यांचा सामना करावा लागल्यामुळे अशा व्यक्ती अस्वस्थ असतात. तसेच या व्यक्तीमध्ये एखादी संख्या, रंग आणि अरेंजमेन्ट्सबाबत विचित्र विचार असतात. 

- जंतू आणि घाण इत्यादींच्या संपर्कात आल्यामुळे या व्यक्तींना दुसऱ्यांनाही त्याचा त्रास होईल असे सतत वाटत राहते. 

- भितीशी निगडीत गोष्टींबाबत फार विचार करतात. म्हणजेच, घरामध्ये एखादी बाहेरील व्यक्ती तर चोरून आली नाही ना? 

- अशा व्यक्तींना सतत आपल्यामुळे एकाद्या व्यक्तीला त्रास तर होणार नाही ना? अशी सतत भिती वाटत असते. 

- धर्म आणि नैतिक विचारांवर गरजेपेक्षा जास्त बोलतात.

- एकादी वस्तू उगाचच सतत तपासून पाहणं. म्हणजे, दरवाजाचा टाळा व्यवस्थित बंद केलं आहे ना?, गॅस बंद केला आहे ना?, घरातील सर्व स्विच बंद आहेत ना? यांसारखे प्रश्न पडणं.
 
- कोणत्याही वस्तू जमा करणं किंवा सांभाळून ठेवणं. म्हणजेच, न्यूजपेपर, जेवणाचे रिकामे डब्बे, तूटलेल्या वस्तू इत्यादी. 

असा करा विचार :

अनेक अशी औषधं उपलब्ध आहेत, जी मेंदूतील पेशींमध्ये सेरोटोनिनची मात्रा वाढवतात. डॉक्टर अनेकदा उपचारासाठी या औषधांचा आधार घेतात. ही औषधं अशा व्यक्तींना फार काळासाठी घ्यावी लागतात. अनेकदा चिंता आणि ताम दूर करणारी औषधं देण्यात येतात. त्याचबरोबर बिहेवियर थेरपीचाही आधार घ्यावा लागतो. ज्यामध्ये त्या रूग्णाला शांत राहण्यासाठी काही व्यायाम सांगितले जातात. बिहेवियर थेरपीप्रमाणे या विचारांपासून दूर राहण्यासाठी काही उपायही सांगितले जातात. 

Web Title: Actress vidya balan obsessive compulsive disorder ocd mental diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.