हृदयासाठी घातक ठरतो 'अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम'; दुर्लक्ष केलं तर बेतू शकतं जीवावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 11:35 AM2019-08-05T11:35:31+5:302019-08-05T11:40:39+5:30

अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम (Acute Coronary Syndrome ) म्हणजे एक अशी स्थिती ज्यामध्ये कोरोनरी आर्टरीमध्ये रक्तप्रवाह अचानक कमी होतो. यामुळे रक्त मुबलक प्रमाणात हृदयापर्यंत पोहोचत नाही. यामुळे व्यक्तीला स्ट्रोक, एंजाइना किंवा हार्ट अटॅकचा धोका होतो.

Acute coronary syndrome know everything about it as well symptoms and cure | हृदयासाठी घातक ठरतो 'अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम'; दुर्लक्ष केलं तर बेतू शकतं जीवावर 

हृदयासाठी घातक ठरतो 'अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम'; दुर्लक्ष केलं तर बेतू शकतं जीवावर 

googlenewsNext

अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम (Acute Coronary Syndrome ) म्हणजे एक अशी स्थिती ज्यामध्ये कोरोनरी आर्टरीमध्ये रक्तप्रवाह अचानक कमी होतो. यामुळे रक्त मुबलक प्रमाणात हृदयापर्यंत पोहोचत नाही. यामुळे व्यक्तीला स्ट्रोक, एंजाइना किंवा हार्ट अटॅकचा धोका होतो. साधारणतः ही समस्या कोरोनरी आर्टरीमध्ये फॅट्स जमा झाल्यामुळे होते. या आर्टरीमुळे हृदयापर्यंत आवश्यक पोषक तत्व आणि ऑक्सिजन पोहोचतो. जर हृदयापर्यंत आवश्यक तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन पोहोचला नाही तर हार्ट मसल्समधील हार्ट सेल्स नष्ट होऊ शकतात. परिणामी व्यक्तीला हार्ट अटॅकचा धोका वाढतो. 

अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोमची लक्षणं : 

1. छातीमध्ये वेदना होणं, या समस्येला एंजाइना असंही म्हटलं जातं. अनेकदा छातीमध्ये वेदनांव्यतिरिक्त जळजळही जाणवते. 

2. वेदना छातीमध्ये सुरू होऊन खांद्यांपर्यंत आणि मानेपर्यंत पोहोचतात. 

3. उलट्या होणं आणि पचनक्रिया सुरळीत नसणं

4. श्वास घेण्यास त्रास होणं

5. अचानक खूप घाम येतो आणि थकवा जाणवू लागतो. 

दरम्यान, अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोमची लक्षणं व्यक्तीचं वय, लिंग आणि इतर मेडिकल कंडिशन्सनुसार वेगवेगळी असू शकतात. 

ही समस्या होण्यामागील कारणं आणि त्यामुळे उद्भवणारा धोका

जेव्हा कोरोनरी आर्टरीमध्ये फॅट जमा होतं, त्यावेळी त्या ब्लॉक होतात. यामुळे हृदयापर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होऊ शकत नाही. तसेच हृदयाचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वही हृदयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हार्ट मसल्सच्या पेशी नष्ट होतात. तसेच नष्ट नाही झाल्या तरिही या पेशी कमकुवत होतात आणि त्या योग्यप्रकारे काम करत नाहीत. 

उपचार 

अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोमवर उपचार करण्यासाठी सर्वात आधी याबाबत सविस्तर जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी ईसीजी करण्यात येतं. याला वैद्यकिय भाषेत इलेक्ट्रोकार्डियोग्राम असं म्हटलं जातं. याव्यतिरिक्त ब्लड टेस्ट आणि कार्डिएक परफ्यूजन स्कॅनमार्फत या सिंड्रोमबाबत सविस्तर जाणून घेणं शक्य होतं. या टेस्टच्या आधारावरच डॉक्टर्स निर्णय घेतात की, लक्षणं एंजाइनाची आहेत की, हार्ट अटॅकची

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम एक मेडिकल एमर्जन्सी आहे. म्हणजेच, यासाठी लगेच उपचार घेणं आवश्यक आहे. जर कोणत्याही व्यक्तीमध्ये वरील लक्षणं दिसून आली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. 

वैद्यकिय उपचारांसोबतच डाएटमध्ये काही बदल करून एक्यूट कोरोनरी सिंड्रोमपासून बचाव करणं शक्य होतं. 

  • धुम्रपान आणि मद्यपान करणं टाळावं
  • हेल्दी डाएट घ्या आणि कमी फॅट्स असलेल्या पदार्थांचं सेवन करा. 
  • जंक फूड आणि फॅटी डाएटपासून दूर रहा. फळं, भाज्यांव्यतिरिक्त लीन प्रोटीनचा आहारात समावेश करा. 
  • नियमितपणे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर लेव्हल चेक करा. 
  • फिटनेसवर लक्ष द्या, दररोज व्यायाम करा. 
  • आपलं वजन वेळोवेळी चेक करा आणि कंट्रोलमध्ये ठेवा. 

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Acute coronary syndrome know everything about it as well symptoms and cure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.