बटर किंवा लोण्याऐवजी आहारमध्ये या पदार्थांचा समावेश करणं ठरतं फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 12:56 PM2019-04-07T12:56:50+5:302019-04-07T12:59:43+5:30
कोणत्याही पदार्थांची चव वाढविण्यासाठी अनेकजण त्यामध्ये बटर किंवा लोणी एकत्र करतात. मग ती दाल मखनी असो किंवा पावभाजी. पनीर बटर मसाला असो किंवा बटर पराठा.
(Image Credit : irishtimes.com)
कोणत्याही पदार्थांची चव वाढविण्यासाठी अनेकजण त्यामध्ये बटर किंवा लोणी एकत्र करतात. मग ती दाल मखनी असो किंवा पावभाजी. पनीर बटर मसाला असो किंवा बटर पराठा. पण तुम्हाला माहीत आहे का? बाजारात मिळणारं बटर हे अपेक्षेपेक्षा जरा जास्तच खारट असतं. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पण काय कराल शेवटी बटरचा मोह सोडवत नाही. पण तुम्ही तुमच्या चवीशी अजिबात कॉम्प्रोमाइज न करता बटरऐवजी स्वयंपाकघरातील काही इतर पदार्थ वापरून स्वतःला हेल्दी ठेवू शकता.
(Image Credit : Southern Living)
बटरच्या अतिवापरामुळे होऊ शकतो धोका :
लोणी किंवा बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅट (saturated fat) अधिक प्रमाणात असतं. ज्यामुळे धमन्या बंद होऊ शकतात. तसेच दररोजच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर बटरचा समावेश करणं प्लाक बिल्ड-अपचं कारण ठरू शकतं. एवढचं नाही तर बाजारामध्ये मिळणाऱ्या बटरच्या विविध ब्रँड्समध्ये मोठ्या प्रमाणावर मीठ आणि आर्टिफिशिअल फ्लेवर्सचा वापर करण्यात येतो.
बटरऐवजी तुम्ही या पदार्थांचा करू शकता वापर :
तूप
आयुर्वेदामध्ये प्राचीन काळापासूनच तूप आरोग्यवर्धक फॅट्सचा स्त्रोत मानला जातो. अनेक तज्ज्ञांच्या मते आणि काही अध्ययनांमधून सिद्ध झाल्यानुसार, तूपाचा आहारामध्ये योग्य प्रमाणात समावेश केल्याने हृदय रोगाचा धोका कमी होतो. तूपामध्ये अस्तित्वात असलेलं कॉन्जुगेटिड लिनोलिक अॅसिड हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. टाइप टू डायबिटीजने पीडित असणाऱ्या व्यक्तींमध्ये याचा धोका अधिक असतो. याव्यतिरिक्त असं सांगण्यात येतं की, तांदळासारख्या कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात असणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये तूपाचा समावेश केल्याने त्यांच्यामध्ये असणारी साखर पचवण्यासाठी मदत करतं.
खोबऱ्याचं तेल
उत्तर भारतामध्ये हे थोडं विचित्र वाटत असलं तरिही दक्षिण भारतामध्ये मात्र जेवण तयार करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करण्यात येतो. खोबऱ्याचं तेल पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरतं. नारळाचं तेल सेबमप्रमाणे असतं. जे शरीरामध्ये एक तेल तयार होत असतं. जे स्काल्प ड्राय होण्यापासून वाचवतं. एवढचं नाही तर केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवत नाही. नारळाच्या तेलाचा वापर केल्याने वजन कमी होतं. ताज्या खोबऱ्याच्या तेलामध्ये इतर तेलांपेक्षा जास्त प्रमाणात मीडियम चेन फॅटी अॅसिड (70 ते 85 टक्के) असतं. मीडियम चेन फॅटी अॅसिड अगदी सहज ऑक्सीडाइज्ड लिपिड्स होतात आणि एडीपोज ऊतकमध्ये संग्रहित होत नाही. याप्रकारे मुख्य स्वरूपात मीडियम चेन फॅटी अॅसिडयुक्त नारळाचं तेल वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्याने अनेक आजार दूर करण्यास मदत होते. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरतं. कारण हे शुगर लेबल कमी करण्यासाठी मदत करतं. ऑलिव्ह ऑिलचा वापर लहान मुलांची मालिश करण्यासाठीही करण्यात येतो. ऑलिव्ह ऑइल डिप्रेशन, खॅन्सर, मधुमेह नियंत्रित करण्याचं काम करतो. ऑलिव्ह ऑइल त्वचेसाठीही उत्तम ठरतं.
टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.