केवळ मांसाहारच नाही तर 'या' बियांमधूनही मिळवू शकता प्रोटीन, शरीर होणार नाही कमजोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:32 AM2024-02-27T10:32:32+5:302024-02-27T10:32:57+5:30
असं मानलं जातं की, मांस, मासे, अंडी, दूध इत्यादींपासून प्रोटीन सगळ्यात जास्त मिळतं. जर तुम्ही या गोष्टींचं सेवन केलं नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या बियांमधून भरपूर प्रोटीन मिळू शकतं.
प्रोटीन आपल्या शरीरासाठी एक पोषक तत्व आहे. जे शरीरातील वेगवेगळ्या क्रियांसाठी फायदेशीर ठरतं. याने शरीराची ऊर्जा कायम राहण्यास मदत मिळते. मांसपेशींची निर्मिती आणि मांसपेशी रिपेअर करण्यासाठी प्रोटीन गरजेचं असतं. काही हार्मोन जसे की, इन्सुलिन आणि थायरोक्सिनची निर्मिती प्रोटीनपासून होतं.
असं मानलं जातं की, मांस, मासे, अंडी, दूध इत्यादींपासून प्रोटीन सगळ्यात जास्त मिळतं. जर तुम्ही या गोष्टींचं सेवन केलं नाही तर तुम्हाला वेगवेगळ्या बियांमधून भरपूर प्रोटीन मिळू शकतं.
भरपूर प्रोटीन मिळू शकतं
न्यूट्रिशनिस्ट आणि डयटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, बियांमध्ये प्रोटीन, अमीनो अॅसिड्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. अळशी, चिया, भोपळा, तीळ, सूर्यफुलांच्या बियांमध्ये हे सगळे तत्व मिळतातत.
अळशी
अळशीच्या बियांमध्ये प्रोटीनसोबतच ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि फायबर भरपूर असतं. याने आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. तसेच वजन कमी करण्यासही मदत मिळते. हे शरीराच्या चांगल्या कामांसाठी फायदेशीर असतात.
चिया सीड्स
चिया सीड्समध्ये प्रोटीन, फायबर आणि अल्फा-लिनोलेनिक अॅसिड (ALA) असतं. जे वजन कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर करतं. जर तुम्हाला हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचं असेल, तर याचं सेवन करायला हवं.
सूर्यफुलाच्या बीया
सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रोटीन, व्हिॅटॅमिन E, मॅग्नेशिअम आणि सेलेनिअम भरपूर असतं. जे शरीरासाठी फायदेशीर असतं. शरीराची कमजोरी आणि थकवा दूर करण्यासाठी यांचं सेवन केलं पाहिजे.
तीळ
तिळाच्या बियांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि आयर्न भरपूर असतं. ज्यामुळे हाडे मजबूत होतात, शरीराची ऊर्जा वाढते आणि शरीरासाठी आवश्यक न्यूरोट्रांसमिटर वाढवतात.
भोपळ्याच्या बीया
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रोटीन असतं. सोबतच यात झिंक, मॅग्नेशिअम आणि तेल असतं. याने हाडे मजबूत होतात, शरीराला ऊर्जा मिळते आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.