मेडिकलमध्ये औषधांचा ठणठणाट

By admin | Published: August 2, 2015 10:55 PM2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30

मेडिकलमध्ये औषधांचा ठणठणाट

Adjustment of Medicines in Medical | मेडिकलमध्ये औषधांचा ठणठणाट

मेडिकलमध्ये औषधांचा ठणठणाट

Next
डिकलमध्ये औषधांचा ठणठणाट
-२०१३ ला संपलेल्या दरकराराला मुदतवाढही नाही : कमी अनुदानामुळे रुग्ण अडचणीत
(मेडिकलचा फोटो वापरावा)

नागपूर : राज्यातील मेडिकल कॉलेज व रुग्णालयांना दरकरारावरील उपलब्ध औषध खरेदीचा नियम आहे, मात्र दरकरार ३१ जानेवारी २०१३ रोजी संपला. तेव्हापासून दरकरारला दर तीन महिन्यांनी मुदतवाढ दिली जात आहे, मात्र ऑक्टोबर २०१५ मध्ये संपलेल्या दरकरारला अद्यापही मुदतवाढ देण्यात आली नाही. दुसरीकडे औषध व इतर साहित्य खरेदीसाठी केवळ ९ कोटी ६० लाख रुपये मिळत असल्याने औषध पुरवठादाराचे १६ कोटी रुपये थकले आहेत. परिणामी, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांना साध्या सलाईनसाठी पदरमोड करावी लागत आहे.
मेडिकलमध्ये कोणती औषधे नाहीत हे विचारण्यापेक्षा कोणती औषधे आहेत, हे विचारा, असा प्रश्नच येथील वरिष्ठ डॉक्टर करीत आहे. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात औषधांच्या नावाने ठणठणाट आहे. अपघातग्रस्त व अनोळखी व्यक्ती आल्यास त्याचे नातेवाईक येतपर्यंत त्याच्यावर औषधोपचार होत नाही. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांसाठी औषधेही मोजकीच आहेत. यातही महिन्याभरापासून मेडिकलमध्ये सलाईन नाही. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या दोन हजाराच्यावर रुग्णांवर आणि भरती असलेल्या दीड हजाराच्यावर रुग्ण औषधीच्या तुटवड्यामुळे प्रभावित झाले आहेत. बीपीएलच्या रुग्णांचेही हाल सुरू आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या औषधाचे दरकरार ३१ जानेवारी २०१३ ला संपले. त्यानंतर तीन-तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ येत्या ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी संपली. यामुळे स्थानिक पातळीवर औषधांची खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेला लागणारी आवश्यक औषधे व साहित्याचाही तुटवडा आहे. सुमारे २ हजार औषधांचे दरकरारच तयार झाले नसल्याची माहिती आहे.

Web Title: Adjustment of Medicines in Medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.