दोस्तीची ताकद... मित्र जेवढे जास्त, तेवढी जास्त टिकते स्मरणशक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 04:42 PM2018-07-16T16:42:23+5:302018-07-16T17:22:02+5:30

जसजसं वय वाढत जातं, तसतशी मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. वृद्धापकाळात विस्मृतीचा आजार जडतो. तो आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर भरपूर मित्र जोडा.

advantages of having a large group of friends | दोस्तीची ताकद... मित्र जेवढे जास्त, तेवढी जास्त टिकते स्मरणशक्ती!

दोस्तीची ताकद... मित्र जेवढे जास्त, तेवढी जास्त टिकते स्मरणशक्ती!

Next

जसजसं वय वाढत जातं, तसतशी मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. वृद्धापकाळात विस्मृतीचा आजार जडतो. तो आपल्याला होऊ नये असं वाटत असेल, तर भरपूर मित्र जोडा. कारण, मित्रमंडळ जेवढं मोठं, सामाजिक बांधिलकी जेवढी अधिक तेवढी तुमच्या मेंदूची क्षमता, स्मरणशक्ती जास्त काळ टिकून राहते, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

भावना आणि प्रेरणा यांना जागृत करणारा मेंदूचा भाग वयासोबत प्रभावित होतो. लोकांच्या मेंदूच्या या भागांमध्ये त्यांचे सामाजिक संबंध सुरक्षित राहतात. 

अमेरिकेच्या कोलंबसमध्ये 'ओहियो स्टेट युनिवर्सिटी'च्या 'न्यूरोलॉजिकल इंस्टीट्यूट'मधील मुख्य संशोधक एलिझाबेथ किर्बी यांनी सांगितले की, 'आम्ही केलेल्या संशोधनातून असे निष्पन्न झाले की, सामाजिक बांधिलकी असलेल्या लोकांच्या मेंदूवर वयाचा प्रभाव पडतो.'

जनरल 'फ्रंटियर इन एजिंग न्यूरोसायन्स' यांनी प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, संशोधकांनी 15 ते 18 महिने उंदरांच्या दोन समूहांवर अभ्यास केला. उंदरांना एक खेळणं देऊन त्यांची स्मरणशक्ती तपासण्यात आली. परिणामी संशोधनातून असे सिद्ध झाले की, समूहाने राहणाऱ्या उंदरांची स्मरणशक्ती चांगली होती. 

किर्बी यांनी सांगितले की, ज्या उंदरांना एकाच सहकाऱ्यासोबत ठेवण्यात आलं होतं ते खेळणं ओळखू शकले नाहीत. तर जे उंदीर समूहात होते, ते नवीन खेळण्याकडे दुर्लक्ष करून जुन्या खेळण्याकडे गेले. भविष्यात यामध्ये आणखी संशोधन करण्यात येणर आहे.

Web Title: advantages of having a large group of friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.