ताप न येणारा डेग्यू माहिती आहे का?; सावध व्हा, 'ही' आहेत लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 03:26 PM2019-07-11T15:26:41+5:302019-07-11T15:29:23+5:30
साधारणतः पावसाळ्यामध्ये डोकं वर काढणारा डेंग्यू हा आजार अनेकांच्या मृत्यूचंही कारण ठरतो. डेंग्यूच्या लक्षणांमध्ये ताप येणं हे अत्यंत महत्त्वाचं लक्षण समजल जातं.
साधारणतः पावसाळ्यामध्ये डोकं वर काढणारा डेंग्यू हा आजार अनेकांच्या मृत्यूचंही कारण ठरतो. डेंग्यूच्या लक्षणांमध्ये ताप येणं हे अत्यंत महत्त्वाचं लक्षण समजल जातं. पण तुम्हाला माहीत आहे का? अनेकदा डेग्यू झालेल्या व्यक्तीला ताप येतच नाही. या डेग्यूला एफेब्रिल डेंगू (Afebrile Dengue) असं म्हटलं जातं. हा डेंग्यू साधारण डेंग्यूपेक्षाही फार घातक असतो. कारण याची लक्षणं समजतचं नाहीत. त्यामुळे अनेकदा रूग्ण याला साधारण व्हायरल इन्फेक्शन किंवा थकवा समजतात.
काय आहे 'एफेब्रिल डेग्यू' (Afebrile Dengue)
'एफेब्रिल डेग्यू' म्हणजेच, ताप न येणारा डेग्यू. डायबिटीसचे रूग्ण, वृद्ध माणसं आणि ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते अशा व्यक्तींना ताप न येणारा डेग्यू होऊ शकतो. अशा रूग्णांना ताप येत नाही, परंतु डेग्यूमध्ये येणारी इतर लक्षणं नक्की दिसून येतात. पण ही लक्षणंही फार कमी प्रमाणात असतात. त्यामुळे अनेकांच्या हे लक्षात येत नाही. त्यामुळे रूग्ण साधारण समस्या समजून डॉक्टरांकडेही जात नाहीत.
'एफेब्रिल डेग्यू' (Afebrile Dengue)ची लक्षणं
'एफेब्रिल डेग्यू'मध्ये फार कमी प्रमाणात इन्फेक्शन दिसून येतात. रूग्णांना अजिबात ताप येत नाही. तसेच शरीरामध्ये जास्त वेदना होत नाहीत. अनेकदा रूग्णांना असं वाटतं की, त्यांना व्हायरल इन्फेक्शनच झालं आहे. परंतु, ब्लड टेस्टनंतर त्यांच्या शरीरामध्ये प्लॅटलेट्सची कमतरता, व्हाइट आणि रेल ब्लड सेल्सची कमतरता होते. जरनल ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाने केलेल्या एका संशोधनामध्ये थायलॅन्डमध्ये ताप न येणाऱ्या डेग्यूची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. संशोधनानुसार, तेथील 20 टक्के मुलांमध्ये अशाप्रकारचा आजार आडळून आला आहे.
या व्यक्तींना असतो जास्त धोका :
- वृद्ध आणि लहान मुलं
- रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती
- डायबिटीस असणार्या व्यक्ती
- कॅन्सरचे रूग्ण
- ट्रांसप्लांट सर्जरी होणाऱ्या व्यक्ती
या वातावरणामध्ये राहा सावधान...
तज्ज्ञांच्या मते, जुलै ते ऑक्टोबर दरम्यान जर कोणाला शरीरामध्ये वेदना, भूक न लागणं, त्वचेवर हलके रॅशेज येणं, लो ब्लड प्रेशर यांसारख्या समस्या होणं परंतु आधी कदीही ताप आलेला नसेल तर हा ताप न येणारा डेंग्यू असू शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जर रूग्ण योग्य वेळी प्लेटलेट्स चेक करत नसेल तर समस्या होऊ शकतात.
ताप येत नसेल तर सावध रहा
अनेकदा जेव्हा डेग्यूचे डास चावतात त्यावेळी ते रक्तामध्ये फार कमी व्हायरस सोडतात. त्यामुळे डेग्यूची लक्षणं फार हलकी दिसून येतात. व्हायरसच्या प्रमाणानुसार ही लक्षणं दिसून येतात. पण आतल्याआत हे व्हायरस पसरत असतात. ज्यामुळे प्लेटलेट्स कमी होतात. ही परिस्थिती अत्यंत घातक असते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.