कितीही खोकला झाला तरी 'हे' 4 कफ सिरप घेऊ नका; 66 मुलांचा मृत्यू, WHO चा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 01:54 PM2022-10-07T13:54:01+5:302022-10-07T13:57:52+5:30

भारतीय कंपनीने सर्दी, खोकला, ताप यावर तयार केलेल्या चार कफ सिरपचा वापर तातडीने थांबवण्याच्या सूचना देत WHOने अलर्ट केलं आहे. 

after death 66 children in gambia who warns against 4 indian cough syrups | कितीही खोकला झाला तरी 'हे' 4 कफ सिरप घेऊ नका; 66 मुलांचा मृत्यू, WHO चा धोक्याचा इशारा

कितीही खोकला झाला तरी 'हे' 4 कफ सिरप घेऊ नका; 66 मुलांचा मृत्यू, WHO चा धोक्याचा इशारा

googlenewsNext

पश्चिम आफ्रिकेतील देश असलेल्या गाम्बियामध्ये कफ सिरप प्यायल्याने तब्बल 66 मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. भारतात तयार झालेल्या चार कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे. भारतीय कंपनीने सर्दी, खोकला, ताप यावर तयार केलेल्या चार कफ सिरपचा वापर तातडीने थांबवण्याच्या सूचना देत WHOने अलर्ट केलं आहे. 

TOI च्या एका रिपोर्टनुसार, जागतिक आरोग्य संघटनेने खोकल्यावरील कफ सिरपचा वापर थांबवा, असा अलर्ट  जारी केला आहे. प्रोमेथाजिन ओरल सोल्युशन (Promethazine Oral Solution), कोफेक्समालिन बेबी कफ सिरप (Kofexmalin Baby Cough Syrup), मकॉफ बेबी कफ सिरप (Makoff Baby Cough Syrup) आणि मॅग्रीप एन कोल्ड सिरप (Magrip N Cold Syrup) या चार कफ सिरपचा वापर थांबवण्याच्या सूचना WHO कडून देण्यात आल्या आहेत. या चारही सिरपची निर्मिती हरियाणास्थित मेडन फार्मास्युटिकल्स कंपनीकडून करण्यात येते.

चारही कफ सिरपची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली. या सिरप्समध्ये डायथायलिन ग्लाइकॉल (diethylene glycol) आणि एथिलीन ग्लायकॉल (ethylene glycol) यांचं प्रमाण अधिक आढळून आलं, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडून जोपर्यंत या कफ सिरपचं विश्लेषण होत नाही, तोपर्यंत या चारही कफ सिरपच्या उत्पादनांच्या सर्व बॅचेस असुरक्षित मानल्या जातील, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

गाम्बियातील मुलांच्या मृत्यूची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं 29 सप्टेंबरला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला दिली होती. मेडन कंपनीच्या चार सिरपमध्ये डायथायलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण जास्त असल्याचं तपासणीत आढळून आलं. या दोन्ही घटकांचं अधिक प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण त्यामुळे अनेक साईड इफेक्ट्स होतात. डायथायलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलच्या अधिकच्या मात्रेमुळे किडनीची समस्या, पोटदुखी, उलटी, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: after death 66 children in gambia who warns against 4 indian cough syrups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.