कोणत्या वयात करावी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 03:24 PM2019-05-07T15:24:17+5:302019-05-07T15:28:54+5:30

भारतातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा आजार वेगाने वाढताना दिसत आहे. पश्चिमी देशांच्या तुलनेमध्ये भारतीय महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा अगदी कमी वयापासूनच सामना करावा लागत आहे.

This age should begin screening for breast cancer | कोणत्या वयात करावी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी?

कोणत्या वयात करावी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी?

googlenewsNext

भारतातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा आजार वेगाने वाढताना दिसत आहे. पश्चिमी देशांच्या तुलनेमध्ये भारतीय महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा अगदी कमी वयापासूनच सामना करावा लागत आहे. ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असणाऱ्या महिलांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढलं आहे. ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे अनेक कारणं असतात. पण अनेकदा ब्रेस्ट कॅन्सर होण्यासाठी आनुवंशिक कारणही असतं. त्यामुळे सुरुवातीलाच काही तपासण्या करणं गरजेचं आहे. परंतु अनेकदा महिलांना ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांची योग्य माहिती नसल्यामुळे सुरुवातीलाच याबाबत समजणं थोडं कठिण असतं. भारतीय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं सरासरी वय 45 ते 50 वर्षांमध्ये आहे. त्यामुळे या वयात महिलांना ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करणं गरजेचं आहे. 

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं : 

1. ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये ब्रेस्ट आणि अंडरआर्म्सच्या आसपास गाठ तयार होते. ज्यामुळे प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. 

2. ब्रेस्ट आणि अंडरआर्म्सजवळ आलेली गाठ दुखण्यासोबतच त्यावर जळजळही जाणवू लागते. 

3. ब्रेस्ट कॅन्सर होण्याच्या स्थितीमध्ये ब्रेस्टच्या आजूबाजूची त्वचा शरीराच्या इतर त्वचेपेक्षा वेगळी दिसू लागते. 

4. ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात होत असताना स्तनांमध्ये थोडासा स्थूलपणा दिसून येतो आणि त्वचा लाल होते. 

5. ब्रेस्टमधून एक द्रव पदार्थ बाहेर येऊ लागतो. 

ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी हे पदार्थ खा : 

1. काळी मिरी 

काळ्या मिरीमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्यामुळे हे कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे आहारामध्ये काळ्या मिरीचा समावेश केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळता येणं शक्य होतं. 

2. टोमॅटो 

टोमॅटोमध्ये अॅन्टीऑक्सिडंट असल्यामुळे हे इम्यून सिस्टम बूस्ट करतात. याव्यतिरिक्त टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात असतात. टोमॅटोचं सेवन करणं ब्रेस्ट कॅन्सरसाठी लाभदायक असतं. 

3. लसूण

लसूण खाल्याने शरीरामध्ये कार्सिनोजेनिक कंपाउंड तयार होण्यापासून रोखतात. यामुळे ब्रेस्ट कॅन्समध्ये फायदा होतो. याव्यतिरिक्त लसणामध्येही अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. 

4. आलं

आल्याचं सेवन केल्याने शरीरामध्ये अस्तित्वात असणारे टॉक्सिन्स दूर होतात. आल्याचं सेवन केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. 

5. ग्रीन टी 

ग्रीन टी प्यायल्याने अनेक प्रकारचे कॅन्सर होतात. दररोज ग्रीन टी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी तयार होत नाहीत. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरपासून बचव करण्यासाठी ग्रीन टीचं सवन करणं फायदेशीर ठरतं. 

टिप : वरील सर्व उपाय केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: This age should begin screening for breast cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.