देशात १६ कोटी लोक करतात मद्यसेवन, ६ कोटी लोकांवर उपचाराची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 11:45 AM2019-02-19T11:45:54+5:302019-02-19T11:48:08+5:30
या सर्व्हेतून ही बाब समोर आली की, मद्यसेवन नशेसाठी पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर भांगेची सर्वात जास्त मागणी आहे.
(Image Credit : today.mims.com)
सरकारकडून करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, देशभरात १० ते ७५ वयोगटातील १४.६ टक्के म्हणजेच १६ कोटी लोक मद्यसेवन करतात. छत्तीसगड, त्रिपुरा, पंजाब, अरूणाचल प्रदेश आणि गोवा इथे मद्याचा सर्वात जास्त वापर केला जातो.
मद्यसेवनानंतर भांगेला जास्त मागणी
या सर्व्हेतून ही बाब समोर आली की, मद्यसेवन नशेसाठी पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर भांगेची सर्वात जास्त मागणी आहे. नशेच्या पदार्थांमुळे आजार होण्याचं प्रमाणही कमी नाही. मद्यसेवनावर निर्भर असलेल्या लोकांमध्ये ३८ पैकी एकाने कोणता ना कोणता आजार असल्याची माहिती दिली. तर १८० पैकी एकाने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं असं सांगितलं. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने एम्ससोबत मिळून हा सर्व्हे केला.
१८६ जिल्ह्यांमध्ये सर्व्हे
हा सर्व्हे ३६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करण्यात आला. यात सांगण्यात आलं आहे की, राष्ट्रीय स्तरावर १८६ जिल्ह्यातील २ लाख १११ घरांसोबत संपर्क केला गेला. आणि ४ लाख ७३ हजार ५६९ लोकांसोबत याबाबत बोलणी केली गेली. गेल्या १२ महिन्यात जवळपास २.८ टक्के म्हणजेच ३ कोटी १ लोकांनी भांग किंवा इतरही काही नशेच्या पदार्थांचा वापर केला.
पाच हजारात एक व्यक्ती करतो मद्यसेवन
भारतात पाच पैकी एक व्यक्ती मद्यसेवन करतो. सर्व्हेनुसार, १९ टक्के लोकांना मद्यसेवनाची सवय आहे. जर २.९ कोटी लोकांच्या तुलनेत १०-७५ वयोगटातील २.७ टक्के लोकांना रोज जास्त नाही पण निदान एक पेग तरी हवा असतो. यांना मद्यसेवनाची सवय लागलेली असते.
हिरॉइन आणि अफीमचा वापर
राष्ट्रीय स्तरावर नशेच्या ज्या पदार्थांचा अधिक वापर होतो, त्यात सर्वाधिक १.१४ टक्के लोक हिरॉइनचा वापर करतात. त्यानंतर १ टक्क्यांपेक्षा काही कमी लोक नशेच्या औषधांचा वापर करतात, तर अर्धा टक्के लोक अफीमचा वापर करतात.
६ टक्के महिलांना सुद्धा मद्याची सवय
या सर्व्हेमध्ये पहिल्यांदाच महिलांशी संबंधित डेटाचा समावेश करण्यात आला आहे. त्यातून कळतं की, २७ टक्के पुरूष अल्कोहोलचं सेवन करतात तर मद्यसेवन करणाऱ्या महिलांची संख्या २ टक्के आहे. इतकेच नाही तर साधारण साडे सहा टक्के महिला अशाही आहेत ज्या केवळ मद्यसेवनावर जगतात. त्यांच्यावर उपचाराची गरज आहे.