' मैनेची हवा' या गाण्याची सोशलमिडीयावरदेखील हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2016 05:50 AM2016-05-03T05:50:18+5:302016-05-03T11:20:18+5:30

सोडा राया नाद खुळा , दूरच्या रानात अशी अनेक लोकप्रिय गीते देणारे संगीतकार हर्षित अभिराज यांच्या मैनेची हवा या नव्या गाण्याची सोशलमिडीयावर देखील हवा असल्याचे दिसत आहे. शांताबाई, झिंगाट या गाण्यापाठोपाठ मैनेची हवा हे गाण्यावर देखील लोक लग्नसोहळे, पार्टी किवा इतर कोणतेही कार्यक्रम असो या गाण्यावर रसिक प्रेक्षक ठेका धरताना दिसत आहे.

The air of 'Mannechi Air' is also on the social media | ' मैनेची हवा' या गाण्याची सोशलमिडीयावरदेखील हवा

' मैनेची हवा' या गाण्याची सोशलमिडीयावरदेखील हवा

Next
डा राया नाद खुळा , दूरच्या  रानात  अशी अनेक लोकप्रिय गीते  देणारे  संगीतकार  हर्षित  अभिराज यांच्या मैनेची  हवा या नव्या गाण्याची सोशलमिडीयावर देखील हवा असल्याचे दिसत आहे. शांताबाई, झिंगाट या गाण्यापाठोपाठ मैनेची हवा हे गाण्यावर देखील लोक लग्नसोहळे, पार्टी किवा इतर कोणतेही कार्यक्रम असो या गाण्यावर रसिक प्रेक्षक ठेका धरताना दिसत आहे. हर्षित अभिराज यांनी आपल्या ठसकेबाज  शैलीत गायलेल्या  या गीताची  शब्द आणि संगीत रचना देखील त्यांनी खुद्द केली आहे . विशेष म्हणजे  या गाण्यात  महाराष्ट्रातील  अनेक  शहरे आणि प्रांतांचा हि  उल्लेख आहे अशा प्रकारचा  उल्लेख असणारे  हे  पहिले लोकगीत आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना हर्षित अभिराज म्हणाले, मैनेची हवा  या गीताला रसिकांचा  जो उदंड प्रतिसाद  मिळतोय , तो उर्जा वाढवणारा नक्कीच आहे. तसेच या गाण्याच्या निर्मितीसाठी  उदय गाडगीळ  यांचे मोलाचे  प्रोत्साहन लाभले .म्युझिक प्रोग्रेमिंग  अभिषेक  काटे यांचे  असून  अभिजित  सराफ  यांनी  या गीताचे साऊंड इंजिनियर म्हणून काम पहिले . संजय पेटकर , श्रीनिवास कुलकर्णी यांचेही योगदान या गीतासाठी महत्वाचे आहे. 


Web Title: The air of 'Mannechi Air' is also on the social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.