वायू प्रदुषणामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा वाढतो धोका - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 04:05 PM2018-11-25T16:05:44+5:302018-11-25T16:05:57+5:30
सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत असून त्याबाबत अनेक संस्था आणि एनजीओ पुढे येऊन जनजागृती करत आहेत. तसं पाहायला गेलं तर वाढत्या वायुप्रदुषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत असून त्याबाबत अनेक संस्था आणि एनजीओ पुढे येऊन जनजागृती करत आहेत. तसं पाहायला गेलं तर वाढत्या वायुप्रदुषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु वायू प्रदुषणामुळेही ब्रेस्ट कॅन्सर होतो, असं नुकतचं एका रिसर्चमधून सिद्ध झालं आहे.
संशोधनानुसार, जास्त ट्रॅफिक असणाऱ्या रस्त्यांच्या जवळ राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. संशोधकांनी असं सांगितलं आहे की, जास्त ट्रॅफिकमुळे होणाऱ्या वायू प्रदुषणामुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. स्कॉटलॅन्डच्या स्टर्लिंग विश्वविद्यालयातील रिसर्च टिमने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या एका महिलेच्या शारीरिक समस्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यावरून नोंदवण्यात आलेल्या निरिक्षणांमधून असा निष्कर्ष काढण्यात आला की, ट्रॅफिकमुळे होणारं वायू प्रदुषण कॅन्सर होण्याचं कारण बनतं.
कॅन्सरग्रस्त महिला उत्तर अमेरिकेतील एका वर्दळीच्या व्यावसायिक परिसरात जवळपास 20 वर्ष सीमा गार्डचं काम करत होती. त्याच दरम्यान ती ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला बळी पडली. ही महिला त्या पाच महिलांपैकी एक आहे, ज्यांना 30 महिन्यांमध्येच ब्रेस्ट कॅन्सरला सामोरं जावं लागलं. त्यानंतर त्या परिसरात इतर अनेक ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणं समोर आली.
मायकल गिल्बर्टसन यांनी सांगितल्यानुसार, निष्कर्षांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग होण्यासाठी कारणीभूत असणारी तत्व असणाऱ्या महिला ट्रॅफिक संबंधी वायू प्रदुषणाच्या संपर्कात येण्यामध्ये एक अनौपचारिक संबंध आहे. असाच काहीसा संबंध रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या लोकांमध्ये वाढणाऱ्या कॅन्सरच्या परिणामांमध्ये दिसून येतो. तसेच गिल्बर्टसन यांनी सांगितले की, ब्रेस्ट कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणामध्ये वायू प्रदुषणाची मोठी भूमिका आहे.