वायू प्रदूषणामुळे 'या' आजाराचाही वाढतो धोका, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 10:25 AM2019-08-23T10:25:52+5:302019-08-23T10:29:39+5:30
Air pollution's Disadvantage: वायू प्रदूषण जगभरात आरोग्यासाठी एका मोठा धोका बनलं आहे. याने श्वसन आणि फप्फुसासंबंधी वेगवेगळ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे.
(Image Credit : cosmosmagazine.com)
वायू प्रदूषण जगभरात आरोग्यासाठी एका मोठा धोका बनलं आहे. याने श्वसन आणि फप्फुसासंबंधी वेगवेगळ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, वायू प्रदूषणामुळे केवळ श्वसनासंबंधीच समस्या नाही तर मानसिक आजारांची वाढ होते. रिसर्चमधून समोर आले की, जे लोक वायू प्रदूषणाच्या जास्त संपर्कात राहतात, त्यांच्यात डिप्रेशन आणि बायपोलर डिसऑर्डरचा धोका इतरांच्या तुलनेत अधिक असतो.
काय सांगतो रिसर्च?
(Image Credit : codeblue.galencentre.org)
अमेरिकेतील पीएलओएस बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, वायू प्रदूषण हे वेगवेगळ्या आजारांचं कारण ठरू शकतं. रिसर्चचे मुख्य लेखक आणि बायोलॉजिस्ट आतिफ खान म्हणाले की, मानसिक आजार मग ते डिप्रेशन असो वा बायपोलर डिसऑर्डर हे तुमच्यासमोर आर्थिक आणि सामाजिक स्तरावर समस्या निर्माण करू शकतात.
काय आहे कारण?
(Image Credit : www.nrdc.org)
याचं कारण वातावरणात पसरलेलं प्रदूषण आहे. खासकरून वायू प्रदूषण. रिसर्चच्या आधारावर अभ्यासकांनी सांगितले की, अमेरिका आणि डेन्मार्कमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमधून ही बाब समोर आली की, जे लोक त्यांच्या जीवनाच्या सुरूवातीच्या काळात वायू प्रदूषणाच्या संपर्कात आलेत, त्यांच्यात मानसिक विकारांचा धोका वाढतो.
कसा कराल बचाव?
1) वायू प्रदूषणापासून बचाव करण्याचा सर्वात चांगला पर्याय हा आहे की, प्रदूषण अधिक असलेल्या परिसरात राहू नका.
२) प्रदूषणामुळे गर्भात वाढणारं बाळही प्रभावित होतं. त्यामुळे गर्भावस्थेत फार जास्त काळजी घ्यावी.
३) घराच्या आजूबाजूला हिरवळ असावी याची काळजी घ्या, जेणेकरून प्रदूषित हवा फिल्टर होईल.
४) तुम्ही घरातही झाडे लावू शकता. याने घरातील हवा स्वच्छ राहील. तसेच तुळशी, स्नेक प्लांट, मनी प्लांट ही झाडे लावा.
५) जर प्रदूषित वातावरणात जावं लागलं तर चांगल्या क्वालिटीचा मास्क नक्की वापरावा.