'या' कारणामुळे भारतातील लोक होताहेत हृदयरोगांचे शिकार - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 10:21 AM2019-09-04T10:21:06+5:302019-09-04T10:28:48+5:30
भारतातील लोकसंख्येचा एक मोठा वर्ग हृदयरोगाने पीडित आहे. याच्या कारणांचा वेळोवेळी वेगवेगळ्या रिसर्चमधून शोध घेतला जातो.
भारतातील लोकसंख्येचा एक मोठा वर्ग हृदयरोगाने पीडित आहे. याच्या कारणांचा वेळोवेळी वेगवेगळ्या रिसर्चमधून शोध घेतला जातो. हृदयरोग वाढण्याची वेगवेगळी कारणेही समोर येतात. आता एका रिसर्चमधून समोर आले आहे की, प्रदूषणही याचं मुख्य कारण आहे. प्रसिद्ध मेडिकल जर्नल 'द लॅन्सेट' मधील एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. वायू प्रदूषणामुळे आजार आणि अवेळी मृत्युचं प्रमाणही जगभरात वाढत आहे. खासकरून विकसनशील देशांमध्ये याचा अधिक प्रभाव बघायला मिळतो.
(Image Credit : nationalgeographic.com)
भारत हा जगातल्या सर्वात जास्त वायू प्रदूषित करणाऱ्या देशांपैकी एक आहे. याचा प्रभाव थेट लोकांच्या आरोग्यावर पडतो. जर तुम्ही वायू प्रदूषणाला चिमनीतून निघणाऱ्या केवळ सामान्य धुराच्या रूपाने बघत असाल तर वेळीच सावध व्हा. यात घरगुती प्रदूषणाचाही समावेश आहे. चुलीतून निघणारा धूर, कचरा जाळण्यातून निघणारा धूरही तुमच्यासाठी हानिकारक आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणासोबत आणि घरगुती प्रदूषणासोबत लढण्याचं एक मोठं अव्हान समोर आहे.
(Image Credit : medicalnewstoday.com)
रिपोर्टनुसार, भारतात प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्युचा आणि आजारांमुळे वाढलेल्या ओझ्याचं काही गुणोत्तर नाही. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हे सर्वात जास्त आहे. वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांसाठी आणि मृत्युंसाठी काहीतरी नीति तयार करणे गरजेचं आहे. तसेच वायू प्रदूषणाला वेळीच आवर घालण्याची गरज आहे.
(Image Credit : www.brecorder.com)
दरम्यान, याआधीही एका रिसर्टमधून एका आजाराबाबत माहिती समोर आली होती. अमेरिकेतील पीएलओएस बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, वायू प्रदूषण हे वेगवेगळ्या आजारांचं कारण ठरू शकतं. रिसर्चचे मुख्य लेखक आणि बायोलॉजिस्ट आतिफ खान म्हणाले की, मानसिक आजार मग ते डिप्रेशन असो वा बायपोलर डिसऑर्डर हे तुमच्यासमोर आर्थिक आणि सामाजिक स्तरावर समस्या निर्माण करू शकतात.