चिंताजनक! संशोधनातून समोर आलं Miscarriage होण्यामागचं मोठं कारण, तज्ज्ञांचा दावा

By Manali.bagul | Published: January 26, 2021 04:45 PM2021-01-26T16:45:58+5:302021-01-26T16:57:27+5:30

Viral News & Latest Updates : वायू प्रदूषणामुळे जसा फुफ्फुसांवर प्रतिकुल परिणाम होतो त्याचप्रमाणे गर्भावरही याचा प्रतिकुल परिणाम होतो.

Air pollution major causes stillbirths and miscarriages in india- Research | चिंताजनक! संशोधनातून समोर आलं Miscarriage होण्यामागचं मोठं कारण, तज्ज्ञांचा दावा

चिंताजनक! संशोधनातून समोर आलं Miscarriage होण्यामागचं मोठं कारण, तज्ज्ञांचा दावा

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेकांना आपला  जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोक आता वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत आहेत. कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी तसंच जगभराला या माहामारीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांचे संशोधन सुरू आहे. वायू प्रदूषणामुळे जसा फुफ्फुसांवर प्रतिकुल परिणाम होतो त्याचप्रमाणे गर्भावरही याचा प्रतिकुल परिणाम होतो. वायू प्रदूषणामुळे दरवर्षी १.६ मिलियन लोकांचा मृत्यू होतो. ही गोष्ट गर्भात वाढणाऱ्या गर्भासाठी अत्यंत धोकादायक असते. असा खुलासा नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. 

वायू प्रदूषणामुळे वाढतोय गर्भपाताचा धोका

रिसर्च द लांसेट प्लेनेटरी हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार वायु प्रदूषणामुळे दक्षिण आशियात सर्वाधिक प्रमाणात गर्भपात (Miscarriage) होत आहेत. रिसर्च द लांसेट प्लेनेटरी हेल्थ (Lancet Planetary Health) मध्ये संशोधन प्रकाशित झालं आहे. या रिसर्चनुसार, वायू प्रदूषण हे दक्षिण एशियातील गर्भपाताचे मुख्य कारण आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये वायू प्रदूषणामुळे जवळपास ३,५०,००० बाळांचा गर्भातच मृत्यू झाला आहे. यामधील ६७% घटना या ग्रामीण भागात घडल्याचे समोर आल्या आहेत. दक्षिण आशियात  १५ मधील एक गर्भपात हे वायूप्रदूषणामुळे होत असल्याचे समोर आले आहे. प्रदूषित हवेमुळे मुलांना जन्माआधीच मृत्यूचा सामना करावा लागत आहे.

Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही

तज्ज्ञांच्यामते  वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्य प्रचंड धोक्यात सापडले आहे. यामध्ये श्वसनविकाराला बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक वर्ष प्रदूषित हवेत काम करणार व्यक्ती, धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती व अनुवांशिकता असणाऱ्या व्यक्तींमध्ये श्वसनसंस्थेशी संबंधित विकार आढळून येतात.  श्वसनविकारांमध्ये सीओपीडी, जुनाट खोकला, अस्थमा, अ‍ॅलर्जी, कफ पडणे, घसा खरखर करणे, कोरडी ढास लागणे या विकारांचा समावेश आहे. 

कोरोनानं होणारा मृत्यूचा धोका कमी करणार डायबिटीसचं 'हे' औषधं; नवीन संशोधनातून खुलासा

श्वसनसंस्थेच्या इतर विकारापेक्षा सीओपीडी हा अत्यंत घातक आजार असून, यामध्ये श्वसननलिका आकुंचन पावतात व त्या कायमस्वरूपी तशाच राहतात.  सीओपीडी हा अत्यंत घातक असला, तरी नियमित औषधापचार व संतुलित आहारामुळे त्यावर नियंत्रण मिळविता येते.

Web Title: Air pollution major causes stillbirths and miscarriages in india- Research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.