बदलत्या वातावरणात ओवा खाण्याचे होतात अनेक फायदे, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 09:25 AM2022-09-19T09:25:11+5:302022-09-19T09:31:13+5:30

Ajwain Benefits : वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपण सतर्क असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून या समस्या दूर ठेवू शकता.

Ajwain for seasonal disease change of weather celery cough cold viral fever infection | बदलत्या वातावरणात ओवा खाण्याचे होतात अनेक फायदे, वाचून व्हाल अवाक्...

बदलत्या वातावरणात ओवा खाण्याचे होतात अनेक फायदे, वाचून व्हाल अवाक्...

googlenewsNext

Ajwain Benefits in Change Of Weather: सध्या सगळीकडे जोरदार पाऊस सुरू  आहे. या बदलत्या वातावरणात सर्दी-खोकला, ताप, इन्फेक्शन होणं कॉमन आहे. जर यातील एक समस्या झाली तर ती दूर करण्यासाठी आठवडा तर नक्कीच लागतो. यामुळे आपल्या शरीरात थोडी कमजोरी येते. अशात वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपण सतर्क असलं पाहिजे. तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून या समस्या दूर ठेवू शकता.

ओव्याचं सेवन

ओवा हा तसा प्रत्येक घरात असतो. लोक वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करतात. कुणी पदार्थाला टेस्ट आणण्यासाठी तर कुणी जेवण झाल्यावर मुखवास म्हणून याचं सेवन करतात. ओवा उष्ण असतो, त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे याचं सेवन केलं तर सर्दी, खोकला लगेच दूर होऊ शकतो.

कसा खावा ओवा?

ओव्याचं सेवन तुम्ही तो वेगवेगळ्या पदार्थात मिक्स करून करू शकता. तसेच काही हेल्थ एक्सपर्ट ओव्याचा चहा पिण्याचा सल्ला देतात. हा चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून उकडून घ्या. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्याल मध व लिंबाचा रस टाकून सेवन करा. याने शरीराला उष्णता मिळेल आणि वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्या दूर होतील.

ओवा खाण्याचे फायदे

ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. इन्फेक्शपासून याने बचाव केला जातो. त्यामुळे ओव्याचं नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

बदलत्या वातावरणात सर्दी-खोकला-ताप होणं कॉमन आहे. अशात ओव्याचा तयार केलेला चहा घेतला तर या समस्या लगेच दूर होतील. कारण याने शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो.

ओव्या वापर नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्टतेची समस्या दूर करण्यासाठी केला जातो. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर ओव्याचं सेवन नक्की करा.

Web Title: Ajwain for seasonal disease change of weather celery cough cold viral fever infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.