ना दुधाचा चहा ना कॉफी...हिवाळ्यात रोज प्या ओव्याचा चहा, फायदे वाचाल तर रोज प्याल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:44 AM2024-10-21T10:44:40+5:302024-10-21T10:51:01+5:30

Benefits Of Carom Seeds Tea : शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल. हा खास म्हणजे ओव्याचा चहा. ओव्याच्या चहामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, फायबर, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन आढळतात. चला जाणून घेऊ या चहाचे फायदे...

Ajwain tea benefits for weight loss, gas and acidity | ना दुधाचा चहा ना कॉफी...हिवाळ्यात रोज प्या ओव्याचा चहा, फायदे वाचाल तर रोज प्याल!

ना दुधाचा चहा ना कॉफी...हिवाळ्यात रोज प्या ओव्याचा चहा, फायदे वाचाल तर रोज प्याल!

Benefits Of Carom Seeds Tea : सामान्यपणे जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये सकाळी दुधाचा चहा पिण्याची पद्धत आहे. चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. मात्र, एक्सपर्ट सांगतात की, दुधाचा चहा आरोग्यासाठी नुकसानकारक असतो. अशात बरेच लोक काळा चहा पितात. अशात आम्ही तुम्हाला एका खास चहाबाबत सांगणार आहोत. ज्याचं सेवन करून तुम्हाला अनेक फायदे मिळतील. शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळेल. हा खास म्हणजे ओव्याचा चहा. ओव्याच्या चहामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, फायबर, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन आढळतात. चला जाणून घेऊ या चहाचे फायदे...

ओव्याचा चहा पिण्याचे फायदे

1) गॅसची समस्या होईल दूर

बऱ्याच लोकांना नेहमीच गॅसची समस्य होत असते. अशा लोकांनी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर ओव्याच्या चहाचं सेवन करावं. ओव्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे पचन तंत्र मजबूत करतात आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करतात.

2) वजन कमी होतं

आजकाल बरेच लोक वाढलेल्या वजनामुळे वैतागलेले आहेत. अशा लोकांनी सुद्धा सकाळी दुधाचा चहा सोडून ओव्याच्या चहाचं सेवन करावं. सकाळी रिकम्या पोटी ओव्याचा चहा प्यायल्याने शरीरात जमा झालेलं फॅट वेगाने कमी होतं. ओव्याचा चहा प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

3) तणाव कमी होतो

आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावात असतात. अशात ओव्याच्या नियमित सेवनाने शरीराला एनर्जी मिळते आणि थकाव दूर होतो.

4) अस्थमामध्ये फायदेशीर

अस्थमासारखा आजार असलेल्या पीडित व्यक्तींनी ओव्याच्या चहाचं सेवन केलं पाहिजे. ओवा गरम असतो अशात अस्थमाच्या रूग्णांसाठी हा औषधाचं काम करतो. सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचा चहा प्यायल्याने अस्थमाच्या रूग्णांना मदत मिळते.

5) मासिक पाळीत फायदेशीर

जर तुम्ही नियमितपणे ओव्याच्या चहाचं सेवन करत असाल तर हे तुमच्या एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याच्या सेवनाने महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.

6) सर्दी-खोकला होईल दूर

आता काही प्रमाणात थंडी जाणवायला लागली आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये सर्दी, खोकला, कफ या समस्या कॉमन आहेत. अशात तुमच्यासाठी हिवाळ्यात ओव्याच्या चहाचं सेवन करणं फार फायदेशीर ठरत असतं. 

कसा बनवाल ओव्याचा चहा?

ओव्याचा चहा बनवण्यासाठी 2 कप पाणी एका भांड्यात उकडून घ्या. यात अर्धा चमचा ओवा टाका आणि कमी आसेवर उकडू द्या. त्यानंतर हे पाणी नंतर एका कपमध्ये टाका आणि वरून त्यात थोडा लिंबाचा रस व थोडं मध टाका. तुमच्या ओव्याचा चहा तयार आहे. 

Web Title: Ajwain tea benefits for weight loss, gas and acidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.