ब्लड शुगर कमी करण्याचं सर्वात स्वस्त औषध ओवा, महागड्या औषधांची गरजच नाही..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 11:31 AM2020-03-06T11:31:26+5:302020-03-06T11:32:32+5:30

आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मसाले खूप फायदेशीर ठरत असतात.  

Ajwaine is the best medicine to reduce blood sugar myb | ब्लड शुगर कमी करण्याचं सर्वात स्वस्त औषध ओवा, महागड्या औषधांची गरजच नाही..

ब्लड शुगर कमी करण्याचं सर्वात स्वस्त औषध ओवा, महागड्या औषधांची गरजच नाही..

googlenewsNext

सध्याच्या काळात  मधुमेह आणि  रक्तदाबासंबंधी आजार अनेकांना उद्भवत असतात.  अनेकदा रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले की परत नियंत्रणात आणणं कठिण होऊन बसतं. आज आम्ही तुम्हाला ओव्याचा वापर करून कशाप्रकारे शरीर चांगलं ठेवता येईल याबाबत सांगणार आहोत. 

भारतात अनेक मसाल्याच्या पदार्थांचा समावेश आहारात केला जातो.  आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मसाले खूप फायदेशीर ठरत असतात.  घरात जेवण झाल्यानंतर तोंडाला चव येण्यासाठी  किंवा खालेल्या पदार्थांचे पचन करण्यासाठी मुखवास खाण्याची पद्धत आहे. मुखवासासाठी बऱ्याचदा ओवादेखील वापरण्यात येतो. शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक पोषक तत्व यात असतात. 

जास्त जेवण झाल्यास अथवा  बाहेरचे पदार्थ खाण्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होतो. अपचनामुळे पोटात गॅस झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. अशा वेळी एखादे  गोळी  घेण्यापेक्षा ओवा तव्यावर तुपात भाजून तो कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरीत आराम मिळू शकतो. कारण ओव्याने तुमच्या पोटातील गॅस लगेच कमी होण्यास मदत होते.

मधुमेहासाठी ओव्याचे फायदे

ओव्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. जे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक असतात. नियमीतपणे एक चमचा  कडुलिंबाची  पावडर, अर्धा चमचा जीरा पावडर आणि ओव्याच्या बिया एकत्र करून  एक ग्लास गरम दूधात घालून प्यायल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होईल. 

गॅस, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. वजन कमी करण्यासाठी तसंच डायबिटिज  टाईप २ चा धोका कमी करण्यासाठी  ओव्याचा आहारात समावेश केला जातो. डायबिटीस आणि वजन कमी करण्याशिवाय ओव्याचे अनेक फायदे आहेत.

नियमित ओव्याचे सेवन केल्याने  ह्रदयविकाराचा धोका कमी होतो. तसंच महिलांना मासिक पाळीच्या वेळी कंबरदुखी आणि पोटदुखीचा अतिशय त्रास होतो. अश्या वेळी  ओवा, गरम पाण्याबरोबर घेतल्याने कंबरदुखी आणि पोटदुखी कमी होते. 

इन्फेक्शन मुळे हिरड्यांना सूज येते, तेव्हा ओव्याच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यामध्ये घाला. या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी देखील ओवा उपयुक्त आहे. ओवा घालून ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीराची पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

खाज-खुजली येत असेल किंवा कुठे जळालं असेल तर, ओवा बारीक करुन तेथे लावा आणि ४ ते ५ तास लावून ठेवा. यामुळे फायदा होईल. ( हे पण वाचा-Corona virus : कोणत्या वयाच्या लोकांना बसतो कोरोना व्हायसरचा जास्त फटका)

सतत खोकला येत असेल तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. नंतर थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे. त्यामुळे आरोग्य चांगलं राहील. ( हे पण वाचा- वेलचीच्या पाण्याने कसं झटपट वजन कमी होतं वाचाल, तर आजपासून सुरू कराल सेवन!)

सध्या  कोरोना व्हायरसचा धोका  जास्त आहे. त्यामुळे कोणत्याही आजाराला घाबरण्याआधी तुम्ही मसाल्याचा आहारात समावेश केला तर जास्त चांगलं ठरेल. म्हणून सकाळी उठल्यानंतर ओव्याचं पाणी प्याल तर तुमची रोगप्रतिकारकशक्ती सुधारेल आणि  इन्फेक्शन  होण्यापासून बचाव करता येईल.

Web Title: Ajwaine is the best medicine to reduce blood sugar myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.