'या' ट्रीटमेंटसाठी जर्मनीला गेला होता अक्षय कुमार, जाणून घ्या फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 06:31 PM2019-04-19T18:31:32+5:302019-04-19T18:38:47+5:30
कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात.
कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. फिट आणि तंदुरूस्त राहण्यासाठी कलाकार विविध गोष्टी करताना आपण नेहमीच पाहतो. अशातच बॉलिवूडच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्यांच्या यादित समावेश होतो तो म्हणजे, अक्षय कुमारचा. नुकताच अक्षय जर्मनीहून भारतात परतला असून पत्नी ट्विंकलसह एयरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आहे. दरवर्षी अक्षय हायड्रोथेरपी ट्रिटमेंट घेण्यासाठी जर्मनीला जात असून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अक्षय ही थेरपी घेत असतो. खरं तर बॉडी मेंटन ठेवण्यासाठी ही थेरपी अत्यंत फायदेशीर ठरते.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी अनेकजण विविध उपाय करत असतात. आता अनेक लोक शारीरिक आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी स्पाची मदत घेतात. परंतु सध्या अनेकजण हायड्रोथेरपीचा आधार घेत असतात.
हायड्रोथेरपी फक्त थकवा दूर करण्यासाठी नाही तर तुमच्या त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये पाण्यामार्फत सर्व समस्यांवर उपचार करण्यात येतात. हायड्रोथेरपीचं एक सेशन अर्धा ते एका तासाचं असतं.
(Image Credit : Alternative Daily)
हायड्रोथेरपी अशी करते तणाव दूर
जेव्हा तुमचं शरीर वेगवेगळ्या तापमानाच्या पाण्याच्या संपर्कात येतं, त्यावेळी तुमचं शरीर आणि मूडमध्ये बदल घडून येतात. थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने शरीराला एक झटका लागतो. जो शरीर मजबुत होण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. थंड पाण्यामुळे रक्ता धमन्या लवचिक होतात, ज्यामुळे शरीराला रक्त आणि ऑक्सिजन मिळतं. तसेच शरीराला गरम पाणी मिळाल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि शरीरातील रक्त प्रवाह वाढतो.
हायड्रो थेरेपी चे प्रकार :
बालनेओ थेरेपी
बालनेओ थेरेपीमध्ये पाण्याच्या टबमध्ये काही हर्बल उत्पादनं एकत्र करण्यात येतात आणि त्याने आंघोळ करण्यात येते. यामुळे शरीराची स्वच्छता, त्वचेला पोषण आणि ऊर्जा दोन्ही गोष्टी मिळतात. अरोमा बाथही याच थेरपीचा एक भाग आहे. या प्रकारच्या थेरपीमध्ये अत्तर, फूल, खस इत्यादी गोष्टींचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे तणाव आणि चिंता दूर होतात.
थर्मल थेरेपी
थर्मल थेरेपीमध्ये कोमट पाण्याने आंघोळ करण्यात येते. सर्वात आधी त्वचा रोग आणि इन्फेक्शनपासून सुटका करण्यासाठी डोंगरांमधील प्राकृतिक जल स्त्रोत, ज्यांमध्ये गंधक असतं त्यामध्ये आंघोळ करण्यासाठी लोक जातात. आता हिच सुविधा शहरांमध्ये असलेल्या स्पा सेंटर्समध्ये आहे. याचा वापर उन्हाळ्यामध्ये कमी करण्यात येतो. कारण उन्हाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करणं शक्यतो लोक टाळतात. लाल चट्टे, खाज इत्यादींवर ही थेरेपी फायदेशीर ठरते.
थालासो थेरेपी
थालासो थेरेपीमध्ये समुद्राच्या पाण्याचा वापर करण्यात येतो. समुद्रामध्ये अनेक प्रकारची हर्बल उत्पादनं आणि खनिज तत्व आढळून येतात. जे रक्तप्रवाह ठिक करण्यासाठी मदत करतात. तसेच तणाव दूर करून मेंदूला चालना मिळते.
(Image Credit : Softub Express)
शॉवर बाथ
हायड्रो थेरेपीमध्ये शॉवर बाथचंही एक वेगळं महत्त्व आहे. यामुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि शरीरामध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. शॉवर बाथ तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी मदत करतं.
सिट्ज बाथ
आपला एक पाय गरमा पाण्याच्या टबमध्ये ठेवा आणि दुसरा पाय थंड पाण्याच्या टबमध्ये ठेवा. असं केल्याने मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.
वहर्लपूल बाथ यामध्ये गरम पाणीच्या बुडबुड्यांसोबत आंघोळ केली जाते. यामुळे स्नायूंना आराम मिळतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.