अकुलजची हिरोईन, तालमीतला हिरो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 10:33 AM2016-04-26T10:33:24+5:302016-04-26T16:03:24+5:30
डॅशिंग हिरोईन शोधताना अकलूजमधील एका शाळकरी मुलीमध्ये दिसलेली आर्ची, तालमीमध्ये शोधलेला देखणा नायक, करमाळा परिसरात झालेले शूटिंग आणि हॉलिवूडमध्ये झालेले रेकॉर्डिंग असलेल्या ‘सैराट’चा प्रवास लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उलगडला. चित्रपटातील परशा असो की आर्ची, सगळ्यांमध्ये मीच आहे, असे सांगत समाजातील दाहक वास्तवाचे चित्रण करण्यामागची भूमिकाही त्यांनी मांडली. ‘सैराट’च्या टीमने लोकमत कार्यालयाला भेट दिली. मंजुळे यांच्यासोबत चित्रपटातील हिरो-हिरोईन आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या वेळी उपस्थित होते.
ड शिंग हिरोईन शोधताना अकलूजमधील एका शाळकरी मुलीमध्ये दिसलेली आर्ची, तालमीमध्ये शोधलेला देखणा नायक, करमाळा परिसरात झालेले शूटिंग आणि हॉलिवूडमध्ये झालेले रेकॉर्डिंग असलेल्या ‘सैराट’चा प्रवास लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उलगडला. चित्रपटातील परशा असो की आर्ची, सगळ्यांमध्ये मीच आहे, असे सांगत समाजातील दाहक वास्तवाचे चित्रण करण्यामागची भूमिकाही त्यांनी मांडली. ‘सैराट’च्या टीमने लोकमत कार्यालयाला भेट दिली. मंजुळे यांच्यासोबत चित्रपटातील हिरो-हिरोईन आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या वेळी उपस्थित होते.
‘सैराट’ची कहाणी सांगताना समाजाचे वास्तवच मांडताना आपल्या आयुष्यातील घटनांचा संदर्भ देत मंजुळे म्हणाले, ‘‘रूढ परंपरांना छेद देणारी नायिका हवी होती. कारण यातील आर्ची म्हणजे एकदम बिनधास्त आहे. मुलीने बिनधास्त का असू नये? लाजरंबुजरंच का असावं? एखादा मुलगा तिला आवडला तर तिने स्पष्टपणे का सांगू नये? हे प्रश्न मला पडले. अगदी तशीच आर्ची रिंकूने रंगवली आहे. आर्चीचा शोध घेण्यासाठी मी अनेक आॅडिशन घेतल्या. एकदा अकलूजला गेलो होतो. शाळकरी वयातील रिंकू वडिलांबरोबर भेटायला आली. तिला पाहिलं आणि जाणवलं हिच आर्ची.’’
चित्रपटातील नायक परशा शोधण्यासाठीही पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये फिरलो. शेवटी पुण्याचाच असणारा, पण करमाळ्यात तालमीसाठी गेलेला आकाश दिसला. आर्चीपेक्षा परशा देखणा हवा होता. त्याचे कॅरेक्टरही साधे आहे. मुलगा म्हटला, की तो डॅशिंगच का पाहिजे? हा प्रश्न येथेही होता.’’
या दोन वेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून पारंपरिक विचारात जखडलेल्या सामाजात हळुवार फुलणारी प्रेमकथा सैराट या चित्रपटामधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘सैराट’ हा फॅन्ड्रीचा सिक्वेल नाही. काही धागे यामध्ये सापडतीलही. कारण मी स्वत:ला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सैराट म्हणजे मुक्तपणा आहे. मोकळीक मिळणे आणि आपल्या मनाला जे वाटेल ते करणे म्हणजे सैराट. त्यामुळे तोच मोकळेपणा या चित्रपटातून दिसणार आहे.येत्या २९ एप्रिल प्रदर्शित होणार आहे.
करमाळ्यातील कथेला वैश्विक परिमाण
४‘सैराट’चे स्क्रीनिंग बर्लिनमध्ये झाले होते. खूप मोठे कल्चरल सेंटर होते. वाटले लोक कशाला येताहेत? पण, गोष्ट कोणाचीही असली तरी वैश्विक परिमाण असेल तर ती सगळ्यांना आवडते. संपूर्ण सभागृह भरले होते, असे मंजुळे यांनी सांगितले.
जातपात, रूढीपरंपरांना चित्रमय भाषेत उत्तर
४जातपात, रूढीपरंपरा, समाज या गोष्टी समाजात दिवसेंदिवस जास्त तीव्र होत चालल्या आहेत. समाज मुला-मुलींचे प्रेम स्वीकारायला तयार होत नाही. प्रत्येक आई-वडीलही एके काळी तरुण होते. त्यांनीही कधीतरी प्रेम केले असेल; पण जातीपातीच्या बंधनात अडकून त्यांनी माघार घेतली. त्यामुळे वास्तव शोधण्याचा प्रयत्न ‘सैराट’मधून केला. दोन माणसे एकमेकांवर प्रेम करतात, त्यांना मोकळेपणाने वावरण्याची संधी या समाजात नाही.
सैराट’मय अजय-अतुलचे झिंगाट
प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांना ‘सैराट’ची कथा ऐकवली आणि ते ‘सैराट’मय झाले. वर्ष-दीड वर्ष ते केवळ ‘सैराट’चा विचार करीत होते. काहीही चांगल सुचलं, की सैराटसाठी ठेवत होते. एकदा तर दुसºया एका चित्रपटाचे रेकॉर्डिंग सुरू असताना त्यांना एक कल्पना सुचली. लगेच बाहेर आले आणि फोन करून त्यांनी सांगितली. ‘झिंगाट’ गाण्याने सध्या तरुणाईला याड लावलंय. हे गाणेही अजय-अतुल यांनी लिहिले आहे. त्यांना स्वत:ला ग्रामीण भाषेचा बाज माहिती आहे. त्यामुळे गाणं चित्रपटात अगदी चपखल बसलंय. ते आणखी चांगलं व्हावं यासाठी हॉलिवूडमध्ये या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. या दोघांनी अफलातून काम केलं आहे. आता प्रेक्षक गाण्यांच्या प्रेमात पडलायं; पण चित्रपटातील बॅक्ग्राऊंड म्युझिक आणखी जास्त आवडेल, असे मंजुळे यांनी सांगितले.
झिंगाट’च्या जोशपूर्ण नाचाची कथा
४‘झिंगाट’ गाण्यावरील जोशपूर्ण गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आकाश म्हणाला, ‘‘हा खरं तर फुलआॅन गणपती डान्स; पण तो नागराज मंजुळे यांनी जोशपूर्ण करून घेतला आहे.’’ आकाश ठोसर म्हणतो, ‘‘झिंगाटच्या वेळी शूट करताना माझे मित्र मला ड्रिंक केलंय का, हेदेखील विचारायचे. पण, ते गाणंच असं असल्यामुळे आम्ही फुलआॅन गणपती डान्स केला.’’ मंजुळे म्हणाले, ‘‘शूटिंग सुरू असताना आकाश, रिंकू आणि परशाची भूमिका करणारा मुलगा जो खरोखर अपंग आहे ते नाचायचे. त्यांना सांगितलं, की तशाच स्टेप ठेवा. ताजेपणा असल्यानं प्रेक्षकांना तो पसंत पडत आहे.’’
रिंकूने वाढविले वजन
४सातवीतील रिंकू पाहिली आणि नागराज मंजुळेंना आर्ची सापडली. मात्र, त्यांनी वर्षभर तिच्याकडून तयारी करून घेतली. आठ-नऊ किलो वजन वाढविण्यास सांगितले. रिंकू म्हणाली, ‘‘मुली कशा बोलतात, कशा बघतात हे मला कळायचं नाही. नागराजदादाने माझे खाणेपिणे, व्यायाम कसा करायचा, हे सांगितले आणि एका वर्षाने मला बोलावले. डिसेंबर २०१३मध्ये मला या चित्रपटासाठी ‘तुला निवडले’ असे सांगण्यात आले.’’