केवळ एक ग्लास दारू पिऊनही वाढतो या गंभीर आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 10:26 AM2023-08-08T10:26:54+5:302023-08-08T10:27:26+5:30
Blood pressure : CNN च्या रिपोर्टनुसार, हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना त्या तरूणांनाही करावा लागतो ज्यांना आधी हाय ब्लड प्रेशरची समस्या नाही.
Blood pressure : दारू ही शरीरासाठी नुकसानकारक असते, पण तरीही काही लोक रोज दारू पितात. तर काही लोक कधी कधी पितात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका स्टडीमध्ये खुलासा झाला की, जे लोक रोज कमीत कमी एक ड्रिंकही घेत असतील तरी त्यांचं ब्लड प्रेशर वेगाने वाढतं. CNN च्या रिपोर्टनुसार, हाय ब्लड प्रेशरच्या समस्येचा सामना त्या तरूणांनाही करावा लागतो ज्यांना आधी हाय ब्लड प्रेशरची समस्या नाही.
हा रिसर्च अमेरिकन असोसिएशन जर्नल हायपरटेंशनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. 1997 ते 2021 पर्यंत 7 इंटरनॅशनल स्टडीजच्या डेटामध्ये आढळून आलं की, जे लोक रोज एक ग्लास दारूचंही सेवन करतात त्यांच्यात कधी कधी दारूचं सेवन करणाऱ्या लोकांच्या तुलनेत ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका जास्त असतो.
मायो क्लीनिकनुसार, हाय ब्लड प्रेशरची लक्षण समोर येईपर्यंत ही समस्या शरीराचं आतून बरंच नुकसान करते. जर बीपी कंट्रोलमध्ये नसेल तर अपंगत्व, खराब लाइफ क्वालिटी आणि इतकंच काय तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचीही समस्या होऊ शकते.
रिसर्चचे मुख्य लेखक डॉ. मारको विसिटी म्हणाले की, हे जाणून घेतल्यावर हैराण झालो की, फार कमी दारूचं सेवन करणाऱ्या तरूणांमध्ये ब्लड प्रेशरची लेव्हल जास्त होती. पण या लोकांचं ब्लड प्रेशर फार जास्त दारू पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत बरंच कमी होतं.
ब्लड प्रेशर मरकरीच्या मिलीमीटरच्या दोन संख्यांमध्ये मोजलं जातं. वरच्या नंबरला सिस्टोलिक म्हटलं जातं, जे हृदयाच्या मांसपेशींचं आकुंचन आणि ब्लड पंप मोजतं. तेच खालच्या नंबरला डायस्टोलिक म्हटलं जातं. जे हार्ट बीटच्या मधला दबाव मोजतं.
स्टडीमध्ये आढळून आलं की, सिस्टोलिक ब्लड प्रेशरवर दारूचा नकारात्मक प्रभाव अशा पुरूष आणि महिलांवरही पडत आहे जे दररोज फार कमी प्रमाणातही दारूचं सेवन करतात. स्टडीचे सह-लेखक डॉ. पॉल व्हेल्टन म्हणाले की, 'सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रीडिंग कार्डियोवस्कुलर आजारांचा धोका वाढवतात. पण दोन्हीपैकी तरूणांमध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशरचा धोका सगळ्यात जास्त असतो.