ALERT : स्मार्टफोन वापरणारे व्हा सावधान, अन्यथा होतील ‘हे’ आजार !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 12:13 PM2017-02-16T12:13:34+5:302017-02-16T17:45:52+5:30
आपणास माहित आहे का, की स्मार्टफोन ‘सायलेंट किलर’ आहे. हो, हा स्मार्टफोन आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करतो. याने सांधेदुखी तसेच हातांची बोटे आणि मनगटमध्ये दुखण्याच्या समस्या निर्माण होतात.
Next
सध्या बहुतेक लोक टच स्क्रीन फोनचा वापर करीत आहेत. याने आपण बोटांच्या साह्याने स्क्रीनला वर-खाली करीत असतो, ज्यामुळे हात, बोटं, मनगट आणि खांद्यामध्ये दु:खण्याच्या समस्या निर्माण होतात. स्मार्टफोनच्या जास्त वापराने मांसपेशी आणि हाडांमध्ये दुखणे, सुजणे आदी समस्या उद्भवण्यास सुरुवात होते, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. दुखण्याच्या कारणाने जरी आपण फोन वापरणे बंद करीत असाल तरीही त्याचा परिणाम जास्त काळापर्यंत असतो. हे दुखणे एवढे वाढते की, याने गाठींचा रोग होण्याची संभावना निर्माण होते.
सध्या परिस्थितीत मुले, वृद्ध, तरुण सर्वचजण स्मार्टफोन वापरत आहेत. त्यांना फोनची एवढी सवय लागली आहे की, रात्रंदिवस ते फोन शिवाय राहूच शकत नाही. मात्र आपणास माहित आहे का, की हा फोन ‘सायलेंट किलर’ आहे. हो, हा स्मार्टफोन आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करतो. याने सांधेदुखी तसेच हातांची बोटे आणि मनगटमध्ये दुखण्याच्या समस्या निर्माण होतात. याशिवाय शरीरावर स्मार्टफोनचा बराच वाईट परिणाम होतो, त्याबाबत आज जाणून घेऊया.
* एकच काम जास्तवेळ करत राहिल्याने सांध्यांमध्ये लिगामेंट आणि टेंडनमध्ये सुज येते ज्यामुळे रिपिटेटिव्ह स्ट्रेस इंज्युरी होण्याची संभावना वाढते.
* स्मार्टफोनचा वापर केल्याने मानेला खाली झुकवावे लागते. जर बराच वेळ आपण मानेला एकाच स्थितीत ठेवले तर मानेला आधार देणाऱ्या सर्वाइकल स्पाइनवर खूपच वाईट परिणाम होतो. सोबतच मानेला जास्त वेळपर्यंत खाली झुकविल्याने डोक्याचा भार मानेवर पडतो ज्यामुळे दुखण्याचा त्रास निर्माण होतो.
* अंधाऱ्यात स्मार्टफोनचा वापर केल्याने आपण अंधही होऊ शकतो. न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, दोन महिलांमध्ये ‘ट्रांजिएट स्मार्टफोन ब्लाइंडनेस’ आढळुन आले. त्यात अंधाऱ्यात सतत स्मार्टफोन वापरल्याने त्या महिला १५ मिनिटापर्यंत एका डोळ्याने अंध होत होत्या.
Also Read : टॉयलेटमध्ये स्मार्टफोन वापरताय, सावधान !