ALERT : सतत फेसबुक पाहताय? सावधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2017 03:48 PM2017-02-12T15:48:42+5:302017-02-12T21:18:42+5:30
सतत फेसबुकवर पोस्ट अपडेट करता किंवा कायम इतरांच्या पोस्ट लाईक करणं पसंद करता. मात्र ही सवय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय घातक असणार आहे
Next
आ प्रत्येकजण फेसबुक, व्हॉट्स अॅप अशा विविध सोशल मीडियावर व्यस्त आहेत. यात विशेष करुन बहुतेकजण सतत फेसबुकवर पोस्ट अपडेट करता किंवा कायम इतरांच्या पोस्ट लाईक करणं पसंद करता. मात्र ही सवय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय घातक असणार आहे. ही माहिती एका अभ्यासाच्यामार्फत समोर आली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठानं यासंबंधी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या अभ्यासासाठी सरासरी ४८ वर्षांच्या ५२०० लोकांचा अभ्यास करण्यात आला.
कॅलिफोर्निया विद्यापीठानं केलेल्या या संशोधनात सहभागींनी त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाया परिणामांचं मापन १ ते ४ मध्ये नोंदवलं. तर लाईफ सॅटिस्फॅक्शन १ ते १० मध्ये नोंदवलं. तसंच बॉडी मास इंडेक्सचीही माहिती दिली. या संशोधनात सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांचा फेसबुकचा डेटा वापरण्याची परवानगीही संशोधनकर्त्यांना दिली होती. यामुळे संशोधनात सहभागी असलेल्या लोकांच्या फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्याच्या सवयी आणि इतरांच्या पोस्ट लाईक करण्याची सवय याचा शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करता आला. या संशोधनात सतत फेसबुकवर स्टेटस अपडेट करणं आणि इतरांच्या पोस्ट लाईक करणं यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो असा निष्कर्ष काढण्यात आला.
तसेच आता आपण पाहतो प्रत्येक ५ मिनिटांने आपण फेसबुक आणि व्हॉट्सअॅप चेक करत असतात. दिवसातून १० वेळा फेसबुक चेक करणं हे एका आजारापेक्षा काही कमी नाही. त्यामुळे तुम्हाला देखील हा आजार जडला असेल तर नक्की या सगळ्याचा विचार करा.